महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर शहर हादरलं; एकाच दिवशी तीन जणांची हत्या? - Kolhapur Muder News - KOLHAPUR MUDER NEWS

Kolhapur Muder News : कोल्हापुरात एकाच दिवशी तीन जणांची हत्या केल्याची घटना घडली आहे. (Kolhapur Crime) या घटनेनं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

Kolhapur Muder News
एकाच दिवसात तीन खून

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 10:19 PM IST

Updated : Apr 4, 2024, 11:00 PM IST

कोल्हापूर Kolhapur Muder News:कोल्हापूर शहरातील विविध भागात तीन विविध कारणांमुळं खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सकाळी दहाच्या सुमारास शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यात एका पुरुषाचा शिर नसलेला आणि सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तर दुपारी एका तरुणीला आई आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्यानं तिचा मृत्यू झाला. तसंच तिसरी घटना ही कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलाव येथे घडली आहे. रंकाळा परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आलाय. खून करून मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आहे.

नाले सफाई करताना सापडला मृतदेह: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील सर्व नाले सफाईचं काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यामध्ये आज सकाळी महापालिकेच्या वतीनं जेसीबीच्या साह्याने नालेसफाईचं काम कर्मचारी करत होते. यावेळी कर्मचाऱ्यांना नाल्यात पुरुषाचा सडलेला मृत्यू दिसून आला. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यानं पोलिसांनी त्वरित मृतदेहाचे शीर शोधण्यास सुरूवात केली. मृतदेहाचे शीर नसल्यानं घातपाताची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.



मारहाणीत तरुणीचा मृत्यू: दुसरी घटना ही दुपारच्या सुमारास समोर आलीय. यामध्ये शनिवार पेठेतील शनिवार पोस्ट ऑफिसजवळ राहणारी वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४) हिचा सीपीआरमध्ये उपचारा दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा आढळून आल्यानं तिचा मारहाणीत मृत्यू झाला असावा असा संशय, पोलिसांनी व्यक्त केलाय. तपासा दरम्यान, वैष्णवी पवार ही एका खासगी बँकेत नोकरी करत होती. ती तिची आई आणि भाऊ यांच्यासोबत शनिवार पेठेतील घरात राहत होती. आज सकाळी तिला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं. यावेळी तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्या. दरम्यान, तिच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याचं सीपीआरमधील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृत वैष्णवी हिची आई शुभांगी लक्ष्मीकांत पोवार (वय वर्ष ५०) आणि भाऊ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

धारदार शस्त्रानं वार करून हत्या : शहरातील तिसरी घटना ही सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शहराचं वैभव असलेल्या रंकाळा तलाव परिसरात रंकाळा टॉवर येथे शेकडो पर्यटकांच्या समोर खून झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यादव नगर येथे राहणारा अजय शिंदे (वय ३०) हा तरुण आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसोबत रंकाळा टॉवर परिसरात आला होता. यावेळी संध्याकाळी सहाच्या सुमारास अज्ञात चार ते पाच मारेकर्‍यांनी धारदार शस्त्रानं पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अजय शिंदे याच्या डोक्यात आणि तोंडावर वार झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. एका दिवसात तीन घटनांनी कोल्हापूर शहर हादरून गेलं असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

हेही वाचा -

  1. नाशिकमध्ये धुलिवंदानाच्या सणाला गालबोट; आईसमोर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या... - Nashik Muder News
  2. Indapur Crime News: जेवायला हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या, गँगवॉरची शक्यता
  3. Nagpur Murder Case: कौटुंबिक वादातून मेहुण्यानं केली जावयाची हत्या...
Last Updated : Apr 4, 2024, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details