महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 8:59 PM IST

ETV Bharat / state

कीर्ती व्यास हत्या प्रकरण; सिद्धेश ताम्हणकर, खुशी सजवानी ठरले दोषी - मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय - Kirti Vyas Murder Case

Kirti Vyas Murder Case : 2018 मधील कीर्ती व्यास हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश ताम्हणकर (Siddhesh Tamhankar) आणि खुशी सजवानी (Khushi Sahjwani) या दोन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. दोषी आरोपींना नेमकी कोणती शिक्षा द्यायची यावर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

Kirti Vyas Murder Case
मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय (MH DESK)

मुंबई Kirti Vyas Murder Case: 2018 मधील कीर्ती व्यास हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश ताम्हणकर (Siddhesh Tamhankar) आणि खुशी सजवानी (Khushi Sahjwani) या दोन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. हे दोन्ही आरोपी आणि कीर्ती एकाच ठिकाणी काम करत होते. या प्रकरणात कीर्तीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सिध्देश सध्या तुरुंगात असून खुशी जामिनावर बाहेर आहे. दोषी ठरवल्यानंतर खुशीला ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर खुशीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला होता.


काय आहे प्रकरण : 16 मार्च 2018 ला कीर्तीची हत्या करण्यात आली होती. अभिनेता फरहान अख्तरची माजी पत्नी अधुनाच्या कार्यालयात कीर्ती फायनान्स व्यवस्थापक पदी कार्यरत होती. तर सिध्देश आणि खुशी तिथेच काम करत होते. सिध्देश चार वर्षांपासून तिथे काम करत होता. 2017 मध्ये त्याचं काम असमाधानकारक असल्यानं व्यवस्थापक असलेल्या कीर्तीनं त्याला कामावरुन काढण्याची नोटिस दिली होती. खुशी आणि सिध्देशच्या संबंधांची माहिती कीर्तीला होती. ती माहिती इतरांना समजू नये हे कारण देखील या हत्येमागे असल्याचा पोलिसांना संशय होता. कीर्ती गायब झाल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलिस तिचा शोध घेत होते. सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी यांच्यावर तिच्या हत्येचा आरोप आहे. ग्रॅंटरोड येथील भारतनगर परिसरात कीर्ती राहत होती.

नोकरी जाण्याच्या भीतीनं केली हत्या : सिध्देशच्या कामावर कीर्ती असमाधानी असल्यानं तिनं त्याला नोटिस दिली होती. त्यामुळं नोकरी जाण्याच्या भीतीनं धास्तावलेल्या सिध्देशनं खुशीच्या सहाय्यानं कीर्तीची हत्या केल्याचा त्या दोघांवर आरोप आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात हत्या, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा आरोप करण्यात आला होता. 16 मार्च 2018 रोजी कीर्ती गायब झाली होती. त्यानंतर तिची मिसींग तक्रार दाखल करण्यात आली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे कीर्तीच्या शोधासाठी सिध्देश आणि खुशी देखील पोलिसांच्या संपर्कात होते. कीर्ती गायब झाली त्या दिवशीच्या कीर्तीच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही चित्रिकरणात सिध्देश दिसला होता.

नेमकी कोणती शिक्षा मिळणार? : ज्या गाडीतून कीर्ती, सिध्देश आणि खुशीनं प्रवास केला त्यामध्ये रक्ताचे डाग दिसले होते. कीर्तीच्या आई वडिलांच्या रक्ताची चाचणी केल्यावर ते रक्त कीर्तीचं असल्याचं सिध्द झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. 16 मार्चला कीर्तीचं अपहरण करुन गाडीतच तिची हत्या करण्यात आली आणि वडाळा येथील खाडीत तिचा मृतदेह टाकून दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. 5 मे 2018 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं. दोषी आरोपींना नेमकी कोणती शिक्षा द्यायची यावर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.

हेही वाचा -

  1. EXCLUSIVE: "...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत विरोधकांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - CM Eknath Shinde Interview
  2. केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाजपा आमदारांविरोधात उघड बंड; काय आहे नेमकं प्रकरण? - Lok Sabha Election 2024
  3. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी फेकून दिले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती - Porsche car accident case

ABOUT THE AUTHOR

...view details