महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करुणा मुंडेंना दरमहा दोन लाखांची पोटगी, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय - KARUNA SHARMA BANDRA FAMILY COURT

करुणा मुंडे यांना दरमहा सव्वा लाख पोटगी आणि मुलीला दरमहा 75 हजार रुपये देखभालीसाठी द्या, असे निर्देश वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडेंना दिले आहेत.

Dhananjay Munde wife Karuna Sharma
धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 2:55 PM IST

Updated : Feb 6, 2025, 3:29 PM IST

मुंबई-करुणा शर्मा मुंडे यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी आणि घरगुती हिंसाचारासंदर्भात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांची याचिका अंशत: स्वीकारलीय. करुणा शर्मा यांना पोटगीसाठी दरमहा 1 लाख 25 हजार रुपये आणि मुलगी शिवानी हिच्या खर्चासाठी दरमहा 75 हजार रुपये धनंजय मुंडे यांनी द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिलेत. वांद्रे येथील 71 व्या कोर्टाचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास (जेएमएफसी) ए. बी. जाधव यांनी हा निकाल 4 फेब्रुवारी रोजी दिलाय.

याचिकेच्या खर्चापोटी 25 हजार मिळणार : करुणा शर्मा यांना या याचिकेच्या खर्चापोटी 25 हजार रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम 20 अन्वये ही पोटगीची रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आलेत. याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, करुणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचा 9 जानेवारी 1998 ला आंतरजातीय प्रेमविवाह झालाय. सुरुवातीला ते इंदूरला राहत होते, त्यानंतर ते मुंबईत राहू लागलेत. 2018 पर्यंत त्यांचे कौटुंबिक संबंध सुरळीत होते, त्यानंतर संबंध दुरावू लागले. धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडे यांच्यासोबत दुसरे लग्न केले. धनंजय यांच्या मूळ गावी 2020 मध्ये जेव्हा करुणा यांनी जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्यासोबत धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. करुणा यांनी दरमहा पाच लाख रुपये पोटगी देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती आणि तडजोड रक्कम म्हणून 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. करुणा मुंडे यांनी स्वत:साठी 5 लाख, मुलीसाठी 5 लाख आण‍ि मुलासाठी 5 लाख अशी 15 लाख रुपयांची पोटगी माग‍ितली होती. मात्र, मुलगा 18 वर्षांचा असल्यामुळे तो पोटगीसाठी पात्र ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तर, करुणा यांना 1.25 लाख आण‍ि मुलीसाठी 75 हजार रुपयांची दरमहा पोटगी न्यायालयाने मंजूर केली.

अखेर मला न्याय मिळालाय : करुणा शर्मा या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, मी ही न्यायालयीन लढाई मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत जिंकलीय. पती उच्च पदावर असताना हा लढा देणे कठीण होते, मात्र तीन वर्षांत खूप त्रास सहन करण्याबरोबरच संघर्ष करून अखेर मला न्याय मिळालाय. या लढ्यात मला पूर्ण साथ देणाऱ्या वकिलांचे करुणा मुंडे यांनी आभार व्यक्त केलेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याच्या दाव्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय. करुणा शर्मा यांनी दरमहा 15 लाख रुपये मिळावेत अशी मागणी केली होती. दोन मुलं सोबत असल्यानं तिघांना प्रत्येकी 5 लाख मिळतील, अशी त्यांची मागणी होती.

अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत : करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या, त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झालीय आणि देखभाल खर्च देण्यात यावा. तसेच यात कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये, असे निर्देश आणि 1,25,000 रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिलेत.

हेही वाचाः

Karuna Sharma : करुणा शर्मांनी घेतलं बीडमध्ये घर... आता इथून खरी लढाई सुरू...!

धनंजय मुंडे खंडणी प्रकरण: रेणू शर्मा विरोधात आरोपपत्र दाखल

Last Updated : Feb 6, 2025, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details