शिर्डी (अहमदनगर)Shirdi Sai Baba Darshan:कर्नाटकच्याबिदर जिल्ह्यातील औराद विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री प्रभू चव्हाण यांनी आज (13 जुलै) आपल्या मतदारसंघातील एक हजारहून अधिक नागरिकांना शिर्डी साईबाबांचे दर्शन घडवले आहे.
मतदारांना घडविलेल्या साईबाबांच्या दर्शनाविषयी मत मांडताना भाजपा आमदार प्रभू चव्हाण (ETV Bharat Reporter) विजयासाठी केला होता नवस :गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी प्रभू चव्हाण यांनी शिर्डी साईबाबांना साकडे घातले होते की, मोठ्या मताधिक्यानं विजय मिळाला तर मतदारसंघातील सर्व नागरिकांना दर्शनासाठी घेऊन येईल. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजयी झालो आणि साईबाबांना केलेला नवस फेडण्यासाठी आज एक हजारहून अधिक मतदारसंघातील नागरिकांना साईबाबांच्या दर्शनासाठी घेऊन आलो असल्याचं माजी मंत्री प्रभू चव्हाण यांनी सांगितलं आहे.
साई प्रसादालयात 3 लाखांची देणगी :एक हजारहून अधिक कार्यकर्त्यांना प्रभू चव्हाण यांनी आज (13 जुलै) वाहनांनी शिर्डीला आणले असून साईबाबांच्या दर्शनाबरोबर संस्थानच्या साई प्रसादालयात व्हीव्हीआयपी जेवणही दिलं आहे. दरम्यान यावेळी चव्हाण यांनी साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात 3 लाखांची देणगीही संस्थानला दिली आहे. मागील वर्षीही मतदारसंघातील एक हजार नागरिकांना साईबाबांचे दर्शन घडवलं आहे. यावर्षीही साईबाबांच्या दर्शनासाठी एक हजाराहून अधिक नागरिकांना घेऊन आलो आहे. या पुढेही दरवर्षी मतदारसंघातील नागरिकांना साईबाबांच्या दर्शनासाठी घेऊन येणार असून मतदारसंघातील सर्वच नागरिकांना साईबाबांचं दर्शन घडवणार असल्याचं यावेळी प्रभू चव्हाण म्हणाले आहे.
हेही वाचा:
- ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; विविध विकासकामांचं करणार लोकार्पण - PM Modi In Mumbai
- शरद पवार यांनी डाव टाकल्यामुळे जयंत पाटलांचा बळी; सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप - MLC Election