महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवनेरीच्या पायरीला अभिवादन करून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात; जयंत पाटील म्हणाले,"जनतेपुढे भ्रष्टाचाराचा.." - Jayant Patil On Shivswarajya Yatra - JAYANT PATIL ON SHIVSWARAJYA YATRA

Jayant Patil On Shivswarajya Yatra : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची आज सुरुवात झाली. यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील जनतेपुढे भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

Jayant Patil On Shivswarajya Yatra
जयंत पाटील (ETV Bharat Reporter) (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 10:21 PM IST

पुणेJayant Patil On Shivswarajya Yatra :उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत यात्रेचा पहिला दिवस पार पडला. सकाळी 11 वाजता जुन्नरमधील लेण्याद्रीत पहिली सभा सुरू झाली आहे. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातील विधानसभेमध्ये पोहचणार आहे.

जयंत पाटील महायुती सरकारवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

राज्य शासनावर भ्रष्टाचाराचा आरोप :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरून शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन निर्धारपूर्वक शिवस्वराज्य यात्रेची आज आम्ही सुरुवात करतोय. त्याचं कारण की, महायुतीनं राज्यात भ्रष्टाचाराचा प्रचंड गोंधळ माजवलेला आहे. त्याचं बेगडी स्वरूप महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्यासाठी शिवस्वराज यात्रा येत्या काळात महाराष्ट्रभर करेल." आमची यात्रा साधी आहे. आमचा कोणताही इव्हेंट नाही. परंतु जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडतोय. त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा आहे", असं बोलून त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर अप्रत्यक्षपणं टोला लगावला.

मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? : जयंत पाटील म्हणाले की, "उद्धव ठाकरे दिल्लीला गेले तर ही बाब मविआच्या दृष्टीने चांगलीच आहे. आम्ही एकसंध होऊन निवडणुका लढणार आहोत. एकत्रित सगळे निर्णय घेणार आहोत. अतुल बेनके आमच्या यात्रेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. पण मी जुन्नरमध्ये आल्यानंतर ते मला अद्याप भेटले नाहीत. ते आमच्या पक्षात येऊ इच्छितात, असं मी ऐकलेलं आहे. मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण? हा प्रश्न त्यांना विचारा."

  • शिवस्वराज्य यात्रा ‘या’ मतदारसंघातून जाणार :जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, भोसरी, शिरूर, हडपसर, खडकवासला, दौंड, इंदापूर, बारामती, माळशिरस, मोहोळ, सोलापूर उत्तर, माढा, करमाळा, परांडा, तुळजापूर, उदगीर, अहमदनपूर, केज, आष्टी, बीड, माजलगाव, परळी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, बसमत, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन या भागातून शिवस्वराज्य यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

हेही वाचा:

  1. वक्फ विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंच्या खासदारांचा संसदेतून काढता पाय? राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू - Waqf Amendment Bill
  2. अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh
  3. "...तर मी त्यावेळी पूर्ण पक्षच सोबत घेवून आलो असतो"; अजित पवारांचं शिंदे-फडणवीसांसमोर मोठं विधान - Ajit Pawar On Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details