महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल इतक्या वर्षानंतर जम्मू काश्मीर विधानसभेचं होत आहे अधिवेशन; आज अध्यक्षांची होणार निवड - JAMMU KASHMIR ASSEMBLY SESSION 2024

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षानं यश मिळवलं. ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री पदावर झाले असून आज विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे.

Jammu Kashmir Assembly Session 2024
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 10:31 AM IST

श्रीनगर :जम्मू आणि काश्मीरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं विजय संपादन केला. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर नेते ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज जम्मू काश्मीर विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे. तब्बल सहावर्षानंतर जम्मू काश्मीरमधील विधानसभेचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. आज कामकाजाचा पहिला दिवस असून आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आल्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे सभागृहाला संबोधित करतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेचं आजपासून अधिवेशन :जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यानंतर तिथं विधानसभा निवडणूक 2024 आयोजित करण्यात आली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षानं मोठं यश मिळवलं. विधानसभा निवडणूक 2024 च्या यशानंतर ओमर अब्दुल्ला यांनी 16 सप्टेंबरला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर विधानसभेचं पहिलं अधिवेशन बोलावण्यात आलं. तब्बल सहा वर्षाच्या कालावधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवणुकीनंतर आजपासून पहिलं अधिवेशन पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

नॅशनल कॉन्फरन्सची पार पडली बैठक :जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदावर ओमर अब्दुल्ला आरुढ झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वात नॅशनल कॉन्फरन्सच्या मित्रपक्षांची रविवारी श्रीनगरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे आमदारही उपस्थित होते. यावेळी बोलताना जम्मू काश्मीर काँग्रेस अध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी माध्यमांना माहिती दिली. "नॅशनल कॉन्फरन्स आणि मित्र पक्षांची नियोजित बैठक श्रीनगरमध्ये रविवारी पार पडली. यावेळी बैठकीत काही विषयांवर चर्चा झाली. सोमवारी विधानसभा अधिवेशनात अध्यक्षांची निवड केली जाईल. तिथं नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचं भाषण आहे. उद्या काय होते ते आपण पाहू," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अब्दुल रहीम राथेर यांचं नाव सभापतीपदासाठी आघाडीवर आहे. तर दुसरीकडं 28 आमदार असलेल्या भाजपानं उपसभापतीपदासाठी आमदार नरेंद्र सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री पदी विराजमान; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
  2. काँग्रेसचा ओमर अब्दुल्लांना धक्का ?: आज काँग्रेस आमदार घेणार नाहीत शपथ; 'या' घटनेचा करणार निषेध
  3. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 ; परदेशी शिष्टमंडळावरुन ओमर अब्दुलांची सरकारवर टीका - JK Assembly Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details