अमरावती Amravati Policeman Underwater Yoga : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पर्वावर अमरावती पोलीस दलात कार्यरत असणारे प्रवीण आखरे यांनी आज अमरावती पोलीस जलतरण तलाव या ठिकाणी पाण्याखाली योगसाधना केली. दोन मिनिट तीस सेकंद पाण्याखाली त्यांनी विविध योगासनं केलीत.
पोलीस कर्मचाऱ्याची पाण्याखाली योगसाधना (ETV Bharat Reporter)
जगावेगळं योगासन :'आंतरराष्ट्रीय योग दिन' च्या पर्वावर जगभर अनेक ठिकाणी योगासनानिमित्त लोक एकत्रित येत असताना आपण काहीतरी जगावेगळं करावं, या उद्देशानं पाण्याखाली योगासनं केली असल्याचं प्रवीण आखरे यांनी म्हटलं आहे. अमरावती पोलीस जलतरण तलाव या ठिकाणी प्रवीण आखरे हे मुलांना पोहायला शिकवतात. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनमध्येदेखील योगदान दिलं. त्यांनी पाण्यात बुडणाऱ्या 55 जणांना जीवनदान दिलं. तर पाण्यात बुडालेल्या 78 जणांचे मृतदेह बाहेर काढलेत, असंदेखील प्रवीण आखरे यांनी सांगितलं.
पोलीस आयुक्तांनी केलं कौतुक : "साधारण योगासन सर्वजण करतात. मात्र पाण्यामध्ये योगासन करणं सोपं आणि हवं तितकं शक्य नाही, असं असताना आमचे कर्मचारी प्रवीण आखरे यांनी पाण्याखाली योगासन केलीत. पाण्यावर आणि पाण्याखाली योगासन करण्याचा त्यांचा सराव आहे. फुफुसाची क्षमता यासह स्टॅमिना वाढविण्यासाठी योगासन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. इतरांना अशा योगासनाबाबत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही त्यांना सोपविली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील प्रोत्साहन मिळेल, अशी प्रवीण आखरे यांची कामगिरी आहे, " असे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितलं.
पाण्यात 50 योगासन करण्याचा विक्रम :वयाच्या दहाव्या वर्षापासून प्रवीण आखरे हे पोहण्याचा सराव करतात. त्यांनी 28 मे 2003 ला अमरावती शहरातील तक्षशिला महाविद्यालयाच्या जलतरण तलावात 22 मिनिट 52 सेकंदात पाण्यात 50 योगासन करण्याचा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला आहे.
हेही वाचा
- पुरुषांनी साजरी केली पिंपळ पौर्णिमा... पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारून केली 'ही' मागणी - Pimpal Purnima 2024
- लाइव्ह मुंबईतील योगदिनात पीयूष गोयल यांच्यासह अभिनेता जॅकी श्रॉफचा सहभाग - international yoga day 2024 live
- ''योग फक्त विद्या नाही, विज्ञान आहे''-पंतप्रधान नरेंद्र मोदी - PM Modi on Yoga