बुलढाणा Sandeep Shelke Nomination: संदीप शेळके यांच्याकडून बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. खरं तर काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेवढीच नागरिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळाल्याने या लोकसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संदीप शेळकेंचा आरोप :वन बुलढाणा मिशन ही पहिली चळवळ आहे. जिथे जिल्ह्याचे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते. आपापल्या जिल्ह्याचे सर्वांगीण सर्वव्यापी विकास करायचा आहे. यावेळी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर संदीप शेळके यांनी टीका केली आहे. त्यांनी संसदेत सोयाबीन, कापसावर प्रश्न विचारले नाही. जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल ते बोलत नाहीत. त्यांना जिल्ह्याचे प्रश्न माहीत नाहीत किंवा भूलथापा मारायच्या भावनिक राजकारण करायचं आणि आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी शिकून घ्यायची, असं राजकारण आतापर्यंत त्यांनी केलं. त्यामुळे गेल्या 15 वर्षांत जिल्ह्यात 50 वर्षे मागे नेण्याचं पाप त्यांनी प्रतापरावांनी केलं असेही संदीप शेळके म्हणाले.