धाराशिव : परंडा विधानसभा मतदारसंघातील गुरुदास संभाजी कांबळे हा अपक्ष उमेदवार सध्या चर्चेचा विषय बनलाय. गुरुदास कांबळे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चप्पल हे चिन्ह देण्यात आलं. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन दिवस उरले असतानाच गुरुदास कांबळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेगळीच मागणी केली आहे.
चप्पल घालण्यास बंदी :गुरुदास कांबळे या अपक्ष उमेदवारानं स्वत:च्याच निवडणूक चिन्हाबद्दल केलेल्या मागणीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरात चप्पल घालण्यास बंदी करावी, अशी मागणी या उमेदवारानं केली आहे.
गुरुदास संभाजी कांबळे यांची मागणी (Source - Gurudas Sambhaji Kamble) चप्पल घातल्यास कडक कारवाई : "आचारसंहिता भंग होऊ नये, याची मी स्वतः दखल घेत आहे. मतदारांना मतदान बूथपासून 200 मीटरच्या बाहेरच चप्पल ठेऊन यायला सांगा. ते चप्पल घालून आले, तर माझ्या निवडणूक चिन्हाचा प्रचार होऊन आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. तसंच मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनी देखील चप्पल बाहेर काढून याव्यात. जर कोणी 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी," अशी मागणी कांबळे यांनी केली.
गुरुदास संभाजी कांबळे यांची पत्राद्वारे मागणी (Source - Gurudas Sambhaji Kamble) पायाला कुठलीही दुखापत होऊ नये यासाठी सोय करावी : "मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत चप्पला ठेवण्याची व्यवस्था करणं व मतदारास 200 मीटर अंतरामध्ये पायाला कुठलीही दुखापत होऊ नये, याबाबत सुव्यवस्था करावी," अशी मागणी कांबळे यांनी केली. त्यांच्या या मागणीवर निवडणूक अधिकारी आता नेमका काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुरुदास संभाजी कांबळे यांची पत्राद्वारे मागणी (Source - Gurudas Sambhaji Kamble) हेही वाचा
- "बाळासाहेब ठाकरे अन् काँग्रेसचं वैर..."; नात्याची आठवण करुन देत संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
- शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं; गेटवरच अडवून ठेवलं
- चर्चा तर होणारच! उमेदवारानं प्रचारासाठी खरेदी केला नवा कोरा 'रोड रोलर'