महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोहित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी काढली ईडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - ईडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Rohit Pawar : बारामती ॲग्रो साखर कारखाना प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडारवर असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. तर, दुसरीकडं कार्यकर्त्यांनी ईडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केला आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 6:26 PM IST

अमोल मातेले यांची प्रतिक्रिया

मुंबई Rohit Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार बुधवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर राजकीय नाट्य पाहायला मिळालं. जोपर्यंत रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत आपण जागा सोडणार नसल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रसरकारसह राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

रोहित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा : रोहित पवार एकटे नसून त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. जामखेड, बारामती, पुणे येथील हजारो कार्यकर्ते काल रात्री मुंबईत दाखल झाले असून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. तर बॅलार्ड पिअर परिसरात रोहित पवार यांचा बॅनर लावण्यात आला आहे. ‘पळणारे नाही तर लढणारे दादा’ असं बॅनरवर लिहिण्यात आलंय. तसंच, ईडी कार्यालयाच्या आवारात "दडपशाहीच्या कारवाईचा निषेध करा" असं बॅनर लावण्यात आलंय.



ईडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा :यावेळी कार्यकर्त्यांनी ईडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून घोषणाबाजी केली. रोहित पवारांच्या समर्थनार्थ आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक जमा झाले आहेत. सरकार रोहित पवार यांना त्रास देत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर अनेक कार्यकर्ते संविधान हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहे. सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, अशा घोषणा दिल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी सरकार, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी भवनासमोर ईडीचा निषेध केला.



मी घाबरणार नाही :मी मराठी माणूस आहे, घाबरणार नाही. तपासात सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी आधीच स्पष्ट केलंय. आम्ही ईडी अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व माहिती, कागदपत्रे दिली आहेत. यामागे कोणता विचार, कोणती शक्ती होती हे सांगता येत नाही. पण एका बलाढ्य सत्तेच्या विरोधात आपण सर्वसामान्यांच्या वतीनं आवाज उठवत आहोत. कदाचित त्यामुळंच ही कारवाई होत असावी. आपली चूक नसेल तर, घाबरायचं कशाला, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. इंडिया आघाडीची पहिली 'बिघाडी'! ममता बॅनर्जींचा बंगालच्या निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा
  2. राम मंदिरासाठी शिवसेनेचा लढा; श्रेय लाटण्याचा भाजपाकडून होतोय प्रयत्न?
  3. कोल्हापुरातल्या अयोध्या हॉटेलशी होते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध; हॉटेल मालकांनी सांगितली 'ही' आठवण

ABOUT THE AUTHOR

...view details