महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Patient has to carry in Zoli : आदिवासी वस्तीवर पोहोचण्यासाठीही धड रस्ता नाही, अखेर झोळीमधून रुग्णाचा प्रवास

Patient has to carry in Zoli : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात विकासकामे सुरू असली तरी आदिवासींच्या वाडी वस्तीवर जाण्यास रस्ते नाहीत. त्यामुळे कळंबा वस्ती येथील एका रुग्णाला झोळीतून 300 मीटर अंतरावरील वाकी येथे आणण्यात आलं. पुढे त्याला पुणतांबा येथील आशा केंद्रात दाखल करण्यात आलं.

Patient Travel By Doli
आदिवासी बांधव

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 5:13 PM IST

Updated : Mar 15, 2024, 7:55 PM IST

आदिवासी पाड्यावरील स्थितीविषयी माहिती सांगताना युवक

अहमदनगरPatient has to carry in Zoli :जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवर रस्त्यांची समस्या बिकट आहे. यावरून वाहनेसुद्धा जाऊ शकत नाहीत. याचा प्रत्यय अकोले तालुक्यात आलेला आहे. येथील पश्चिम भागात असलेल्या वाकी (not connecting road in Waki ) मधील कळंबा वस्ती येथील रहिवासी नाथु काळू सगभोर या रुग्णाला झोळीतून 300 मीटर वरून वाकी रस्त्यावर आणले गेले. तेथून त्याला उपचारासाठी अकोले आणि पुढे पुणतांबा येथील आशा केंद्रात दाखल करण्यात आले. या रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. (Ahmednagar District)

रस्ता नसल्यानं आदिवासींची कुचंबना :अकोले तालुक्यातील वाकी परिसरातील कळंबा वस्तीवर 15 कुटुंबे राहतात. पूर्वी या वस्तीवर एकेरी बैलगाडी सहजरित्या जात होती. वाकी रस्त्यापासून 300 मीटरवर असलेल्या या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणं झाल्यानं दुचाकी जाण्यायोग्य देखील नसल्यानं येथील आदिवासी ग्रामस्थांची मोठी कुचंबना होत आहे. मंगळवारी नाथु सगभोर यास अर्धांगवायूचा झटका आल्यानं त्याला झोळीतून त्यांच्या पत्नी गीताबाई सगभोर, जालिंदर सगभोर, दत्तू सगभोर, अक्षय सगभोर या नातेवाईकांनी वाकी रस्त्यावर आणले. तेथून अकोले येथे पोहचवल्यानं तालुक्यातील विकासकामांचे आणि आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत.

रस्त्यांखेरीज पाण्याचाही प्रश्न :अकोले तालुक्यात विकासकामे सुरू असली तरी वाडी वस्तीवर जाण्यास रस्ते नाहीत. पाण्याच्या योजना बंद आहेत. आरोग्य सेवा दुरापास्त आहे; मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गरीब आदिवासींनी करायचे काय, असा सवाल गावचे माजी सरपंच धीरेंद्र सगभोर यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्य सुविधेचा पत्ताच नाही :ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोटीच्या कोटी विकासकामे होत असून त्यांच्या उद्‌घाटनासाठी नेतेमंडळी पुढे सरसावली आहेत; मात्र आदिवासी भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे. तालुक्यातील आरोग्य सेवा मोडकळीस आल्या असून रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप होतोय. तालुक्यातील पाणी योजनांवर कोट्यवधी खर्च होऊनही अजूनही नळाद्वारे पाणी नाही. ही आदिवासी जनतेची फसवणूक आहे. याबाबत लोक प्रतिनिधी नेमके काय करतात असा प्रश्न जि.प. सदस्या सुनिता भांगरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

  1. Bharat Jodo Nyay Yatra: गरिबांवर अन्याय होत असल्यानं 'न्याय' हा शब्द यात्रेत जोडला- राहुल गांधी
  2. Rahul Gandhi News: राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा'मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचणार; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी
  3. Student brutally murdered : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह
Last Updated : Mar 15, 2024, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details