महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बँकेच्या लॉकरमधून 5 कोटी सोन्याच्या चोरीतील आरोपींना सिनेस्टाईलनं अटक, नाशिक पोलिसांची कामगिरी - Nashik Crime News - NASHIK CRIME NEWS

Nashik Crime News : जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय सेफ्टी लॉकरमधून (Safety Locker) पाच कोटींचं सोनं चोरून (Gold Theft ) नेल्याप्रकरणात शहर गुन्हेशाखेनं एका संशयिताला गुजरातमधून अटक केली आहे. तर दुसरा पोलिसांच्या हातातून निसटला.

Nashik Crime News
पोलिसांनी ठोकल्या बेड्या (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 10:04 PM IST

नाशिक Nashik Crime News : नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्सच्या सेफ्टी लॉकरमधून सुमारे पाच कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट (Gold Theft) करून फरार झालेल्या टोळीतील दोन मुख्य आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलय. हे आरोपी आंध्र प्रदेशात देवदर्शनासाठी गेले असून त्यांनी तेथे टक्कल केल्याची खात्रीशीर माहिती, पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधून गुजरात गाठले होते. संशयित सतीश चौधरी यास तब्बल तीन तास जंगलात शोधून बेड्या ठोकल्या. मात्र त्याचा दुसरा साथीदार रतन जाधव फरार झाला.



सापळा रचून केली अटक: नाशिकमध्ये 4 जून रोजी जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयात काही अज्ञातांनी खिडकीतून प्रवेश करून सेफ्टी लॉकरच्या किल्ल्या घेत त्यामधील तब्बल पाच कोटी रुपयांचे दागिने घेऊन फरार झाले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वी तुकाराम गोवर्धने, वैभव लहानगे यांना अटक केली. या गुन्ह्यात निष्पन्न झालेले सतीश चौधरी, रतन पाटील आणि अर्जुन पाटील हे तेव्हापासून पोलिसांना चकवा देत होते. गुंडाविरोधी पथक त्यांच्या मागावर होते. वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. या दोघांनी 15 आठवड्यापूर्वी एक कार खरेदी करून देवदर्शनासाठी आंध्र प्रदेश गाठल्याची माहिती, पोलीस पथकाला मिळाली होती. त्यांनी एक पथक गुजरातकडं रवाना करत सतीश चौधरी यास अटक केली.



आरोपीला नाशिकला आणले : गुजरात येथील हलोल जवळच्या जंगलात शिरलेले गुंड विरोधी पथक सुमारे तीन तासानंतर आरोपी सतीश चौधरीनं शोधले. यावेळी नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पथकाने स्थानिक पोलिसांना स्वतःची ओळखपत्रं दाखवली आणि तेथून सतीश चौधरीला घेऊन हे पथक नाशिकला आले. त्याचा साथीदार रतन जाधव हा जंगलात पळून गेला. चौधरी याने अहमदनगर येथून 3 लाख 41 हजार रुपयाची जुनी कार खरेदी केली होती. या कारमधून तिरुपती बालाजी मंदिर गाठले आणि तेथून राजस्थान, जयपूर मार्गे गुजरातमध्ये आले होते.



सिनेस्टाईल पाठलाग :गुजरातच्या हलोल शहरात गुंड विरोधी पथक आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना एका मारुती स्विफ्ट कारमधून टक्कल केलेल्या दोन व्यक्ती आणि डोक्यावर मराठमोळी टोपी परिधान करून प्रवास करताना दिसले. अशात पोलीस निरीक्षक मोहिते यांनी त्यांच्या कार चालकाला त्या कारचा पाठलाग करण्यास सांगितलं. ओव्हरटेक करत त्यांना कार थांबवण्याचा इशारा दिला. मात्र, त्यांनी पथकाच्या कारला कट मारत त्यांची कार भरधाव वेगानं पुढे नेली. परंतु पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग केला.

हेही वाचा -

  1. सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; 20 प्रकरणांमध्ये 6.75 कोटी रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त - Mumbai Airport gold smuggling
  2. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 प्रकरणामध्ये 7.46 कोटींचे सोने जप्त
  3. सोने तस्करीच्या कारवाईत डीआरआयच्या हाती घबाड, झवेरी बाजारातून कोट्यवधींच्या रकमेसह 18.48 किलोसह 9.67 किलो चांदी जप्त - DRI raid zaveri bazar

ABOUT THE AUTHOR

...view details