महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना आमदार अपात्र प्रकरण : ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी

Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर दिलेल्या निकालाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. आता या याचिकेवर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 12:18 PM IST

Updated : Mar 7, 2024, 5:43 PM IST

मुंबई/नवी दिल्ली Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. ठाकरे गटानं राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. प्रतिवादींना 1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्यास न्यायालयानं सांगितलंय.

विधानसभा अध्यक्षांचा उबाठा गटाला धक्का :शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवलं. तसेच शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं उबाठा गटाला मोठा धक्का बसला. उबाठा गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं उबाठा गटाची याचिका दाखल करुन घेत या याचिकेवर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं होतं.

शिवसेना पक्षात उभी फूट :दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षानं मराठी नागरिकांच्या हक्कासाठी रान पेटवलं. त्यामुळं शिवसेना पक्ष घराघरात पोहोचला. मात्र शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं तब्बल 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांनी सूरतमार्गे गुवाहाटीला जाऊन नंतर भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. त्यामुळं शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण अगोदर सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडं टोलवलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. त्यामुळं उबाठा गटानं विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं.

हेही वाचा :

  1. शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत येणार? मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात
  2. मोठी बातमी! राहुल नार्वेकरांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर 'सर्वोच्च' सुनावणी होणार
Last Updated : Mar 7, 2024, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details