नागपूर HCLTech Worker Dies : एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये (HCL Technologies) काम करणाऱ्या एका 40 वर्षीय कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्यानं (Cardiac Arrest) निधन झाले. ही घटना शुक्रवारी (27 सप्टेंबर) घडली. नितीन एडविन मायकल (Nitin Edwin Michael) असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? : नितीन मायकल हे एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करत होते. सोनेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन यांनी मिहान परिसरात असलेल्या कार्यालयाच्या वॉशरूममध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) नेलं. तिथं पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी शवविच्छेदन करून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक शवविच्छेदन निष्कर्षावरून असं दिसून येतं की, हृदयविकाराचा झटका हे नितीनच्या मृत्यूचं कारण आहे. पोलीस सध्या या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
कंपनीनं निवेदनात काय म्हटलंय? : नितीन यांच्या मृत्यूनंतर एचसीएल टेक्नॉलॉजीजकडून रविवारी (30 सप्टेंबर) एक निवेदन जारी करण्यात आलंय. कंपनीच्या प्रवक्त्यानं या निवेदनात म्हटलंय की, "घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्याला कॅम्पस क्लिनिकमध्ये आपत्कालीन आरोग्य सेवा देण्यात आली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एचसीएलटेक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करत आहे." तसंच एचसीएल टेक्नॉलॉजीज आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ऑन-कॅम्पस क्लिनिक आणि वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसह आरोग्य सेवा कार्यक्रम प्रदान करतं असल्याचंही निवेदनात म्हटलंय.
सीए तरुणीचा मृत्यू :पुण्यातीलईवाय कंपनीत काम करण्याऱ्या 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अॅना सेबस्टियनचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या प्रकरणात अॅनाच्या आईनं मुलीवर कामाचा अत्याधिक दबाव टाकल्याचा आरोप केला. या कंपनीत कामावर रुजू होऊन अॅनाला केवळ चार महिने झाले होते. अॅनाच्या निधनानंतर वर्क लाईफ बॅलन्सवरून वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय.
हेही वाचा -
- पेन्शनसाठी हयातीचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा तहसील कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Old Woman Dies Case Miraj
- हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच शरीरात दिसतात ‘ही' सात लक्षणं; दुर्लक्ष केल्यास पडेल महागात - Symptoms Before A Heart Attack
- भारतातील तब्बल 22 कोटी नागरिक उच्चरक्तदाबाने ग्रस्त, 46 टक्के लोक असतात अनभिज्ञ - WORLD HYPERTENSION DAY 2024