इथोपिआच्या हायली लेमीनं पटकावल टाटा मॅरेथॉनचं विजेतेपद मुंबई Tata Mumbai Marathon 2024: दक्षिण मुंबईत टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 7 प्रकारच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं. यात फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन एलिट चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी, रन सीनियर सिटीझन रन आणि ड्रीम रन असे सात प्रकार होते. या 19 व्या मुंबई टाटा मॅरेथॉनचा मुख्य विजेतेपद इथोपियाच्या हायली लेमीनं पटकावलंय.
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ विजेते :
१) हायली लेमी, २:०७:५०, इथोपिआ
२) हेमानॉट अल्यू, ०२:०९:०३, इथोपिआ
३) मित्कु तफा, ०२:०९:५८, इथोपिआ
१) अबेराश मिनसिवो, ०२:२६:०६, इथोपिआ
२) मूलूअबट तेसगा, ०२:२६:५१, इथोपिआ
३) मेधिन बेजेनी, ०२:२७:३४, इथोपिआ
- पूर्ण मॅरेथॉन (भारतीय गट) :
१) श्रिनु बुगाथा, २:१७:२९
२) गोपी थोनकल, २:१८:३७
३) शेरसिंह तन्वर, २:१९:३७
१) सावन बरवाल १:५:७
२) किरण म्हात्रे १:६:२३
३) मोहन सैनी १:६:५५
१) अमरीता पटेल, १:१९:२०
२) पूनम दिनकर, १:१९:२०
३) कविता यादव, १:२०:४५
रेकॉर्ड ब्रेक धावपटूंचा समावेश: या मॅरेथॉनमध्ये एकूण 59,515 स्पर्धकांनी भाग घेतला. यात मुख्य मॅरेथॉनमध्ये 9724 पुरुष तर 987 महिलांचा समावेश होता. तर अर्ध मॅरेथॉनमध्ये 12322 पुरुष तर 2896 महिलांचा समावेश आहे. 10 किलोमीटरच्या स्पर्धेत 4140 पुरुष तर 2990 महिलांनी भाग घेतला होता. ड्रीम रन या स्पर्धेसाठी 12390 पुरुष तर 8200 महिलांनी सहभाग घेतला होता. सीनियर सिटीजनमध्ये 1010 पुरुष तर 722 महिलांनी सहभाग घेतला असून विकलांग दौडमध्ये 779 पुरुष आणि 335 महिलांनी सहभाग घेतला.
केटी मून मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर: ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन सारख्या सहनशक्तीच्या अशा शर्यतीमुळंच मानसिक आरोग्य सुधारते आणि खेळाडूंना योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होते. तसंच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताची शान असल्याचंही केटी यांनी सांगितलंय.
- या कलाकारांचा सहभाग : या मॅरेथॉनमध्ये अभिनेत्री निकिता दत्त, तारा शर्मा, सागरीका घोष, अभिनेता मॉडल मिलिंद सोमन, राहुल बोस यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. त्याचबरोबर उद्योगपती अनिल अंबानी, चंद्रशेखरन नटराजन, विनिता सिंग यांचाही सहभाग असणार आहे.
हेही वाचा :
- रविवारी होणाऱ्या टाटा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी मुंबईनगरी सज्ज
- मुंबई मॅरेथॉनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फडकवला प्रभू श्रीरामाचा भगवा झेंडा
- टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्षांनी दाखवला हिरवा झेंडा; हाफ मॅरेथॉनमध्ये सैन्यदलाच्या जवानांनी मारली बाजी