जळगाव Girish Mahajan Viral Video:गुरुवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे (Girish Mahajan) जिल्ह्यातील जामनेर मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील लिहा तांडा येथे ते भंडारासाठी गेले होते. यावेळी महाजन यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. नागरिकांनी गावाच्या विकासासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी चिखलातून पळ काढला. तर मंत्र्यांच्या या वागणुकीवर गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
मंत्री गिरीश महाजन व्हायरल व्हिडिओ (ETV BHARAT Reporter)
व्हिडिओमध्ये काय :गुरूवारी मंत्री गिरीश महाजन हे जामनेर मतदारसंघातील लिहा तांडा गावाच्या दौऱ्यावर होते. या गावातील रस्त्यावर चिखल झाला होता. दरम्यान, गावातील रस्त्याच्या वाईट अवस्थेबद्दल नागरिकांनी महाजन यांना जाब विचारला. मात्र, यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर न देता दुचाकीवर बसून याच चिखलयुक्त रस्त्याने जाताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर काही तरुण गिरीश महाजनांनाना हाक मारून त्यांच्यामागे धावताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
व्हिडीओवरुन सध्या राजकारण तापलं : मंत्री गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा क्षेत्रातून गेल्या 30 वर्षांपासून सतत निवडून येत आहेत. त्यांनी अनेक मंत्रीपदं देखील भूषवली आहेत. त्यांनी पाणी पुरवठा मंत्री, वैद्यकीय मंत्री, आणि सध्या ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ग्रामविकास मंत्री असताना देखील त्यांच्याच मतदार संघात रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं तसंच गावाचा विकास न झाल्यानं त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या व्हिडिओवरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. गिरीश महाजन यांना भाजपाचे संकट मोचक समजले जाते. त्याचबरोबर फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाते. आंदोलन असो की, बंडखोरी रोखणे, किंवा कुणाची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करणे असो ही सर्व जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर असते. असं असताना मात्र, संकटमोचक गिरीश महाजन यांना त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात रोषाला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा -
- देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते - अनिल देशमुख - Anil deshmukh On Devendra Fadnavis
- निधी वाटपावरून दोन मंत्र्यांमध्ये वाद; संजय राऊत म्हणतात "महाराष्ट्राला कंगाल केलं..." - Sanjay Raut on Mahayuti
- पोलिसांनी लाठीचार्ज करून 10 तासानंतर आंदोलकांना पांगवले, आंदोलकांकडूनही दगडफेक - Badlapur School Case