महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : आता मुंबई गुन्हे शाखा करणार भावेश भिंडेचा 'कसून' तपास, प्रकरण वर्ग - Ghatkopar Hoarding Collapse

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला पोलिसांनी उदयपूर इथून अटक केली. त्यानंतर आता हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आलं आहे.

Ghatkopar Hoarding Collapse
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 1:34 PM IST

मुंबई Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोप भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी उदयपूर इथून पकडून आणलं. त्यानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता घाटकोपर दुर्घटना प्रकरणाचा तपास पंतनगर पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखा कक्ष 7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

भावेश भिंडेचा ताबा आता गुन्हे शाखेकडं :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला गुरुवारी उदयपूर इथून गुन्हे शाखा कक्ष 7 च्या पथकानं अटक करुन मुंबईत आणलं. त्याला शुक्रवारी पंतनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं. पंतनगर पोलीस भिंडे याला राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणार होते. तत्पूर्वी हा तपास गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आल्यामुळे भिंडेचा ताबा पुन्हा गुन्हे शाखा कक्ष 7 कडं देण्यात आले. गुन्हे शाखेकडून भिंडेला अटक करुन किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बचावकार्य संपल्याची महापालिकेची घोषणा :मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी सकाळी 66 तास चाललेलं घाटकोपरचं बचावकार्य संपल्याची घोषणा केली. मात्र या ठिकाणचा मलबा हटवण्यासाठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. घाटकोपर इथल्या पेट्रोल पंपावर भला मोठा होर्डिंग पडल्यानं तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला. या होर्डिंगच्या मलब्याखाली दबून अनेक वाहनांचं नुकसान झालं. तर 75 नागरिक जखमी झाले.

एनडीआरएफची दोन पथकांनी इतकी वाहनं काढली बाहेर :घाटकोपर दुर्घटनेतून आतापर्यंत तब्बल 30 दुचाकी, 31 चारचाकी 8 रिक्षा आणि दोन अवजड वाहनांसह तब्बल 73 वाहनं घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले आहेत. ही सगळी वाहनं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अद्यापही या ठिकाणी तीन अग्निशमन दलाची वाहनं आणि काही वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली आहे.

हेही वाचा :

  1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : उदयपूरमध्ये लपलेल्या भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत, दुपारी करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case
  2. घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं भावेश भिंडेला उदयपूरमध्ये ठोकल्या बेड्या - Ghatkopar Incident

ABOUT THE AUTHOR

...view details