नवी मुंबई Navi Mumbai Ganpati Visarjan : गणेशोत्सव 2024 ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त’ साजरा करावा अशाप्रकारे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 7 सप्टेंबर रोजीच्या गणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील 10,672 श्रीगणेशमूर्तींचं भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झालं. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळं तसंच 136 कृत्रिम विसर्जन स्थळं अशा 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबईत दीड दिवसाच्या तब्बल 'इतक्या' श्रीगणेशमूर्तींचं विसर्जन; कृत्रिम तलाव संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद - Ganpati Visarjan 2024 - GANPATI VISARJAN 2024
Ganpati Visarjan 2024 : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा गजर करत नवी मुंबईत रविवारी (8 सप्टेंबर) दीड दिवसाच्या 10 हजार 672 गणरायांना भाविकांनी भक्तिभावात निरोप दिला. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी यावेळी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं.
Published : Sep 10, 2024, 8:09 AM IST
असं करण्यात आलं विसर्जन :22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7895 घरगुती तसंच 11 सार्वजनिक मंडळांच्या 7906 श्रीमूर्तींचं विसर्जन संपन्न झाले. तर 136 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2761 घरगुती आणि 5 सार्वजनिक मंडळांच्या 2766 श्रीमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. अशाप्रकारे 10656 घरगुती आणि 16 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10,672 श्रीमूर्तीचं विसर्जन सुरळीतपणे पार पडलं. यामध्ये 2715 शाडूच्या श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता. दरम्यान, शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांचा आकर्षक कापडी पिशव्या देऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला.
कृत्रिम तलाव संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद : यंदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं इकोफ्रेंडली दृष्टीकोन जपत कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आणि या माध्यमातून नैसर्गिक जलस्त्रोत शुध्द राखण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं होतं. या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. त्यादृष्टीनं महानगरपालिका क्षेत्रात 136 इतक्या मोठ्या संख्येनं नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. यामुळं विसर्जन स्थळांवर गर्दी होणंही टळलं.
हेही वाचा -
- दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना जड अंतकरणानं निरोप : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचंही विसर्जन - Ganeshotsav 2024
- 'असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा', मुंबईतील तरुणीच्या घरी चॉकलेटचे बाप्पा विराजमान, 'असं' केलं जाणार विसर्जन - Ganeshotsav 2024
- गणपती विसर्जन सोहळ्यात सलमान खाननं कुटुंबासह केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल - SALMAN KHAN