धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Thane Gang Rape Case - THANE GANG RAPE CASE
Gang Rape On Married Women : ठाण्यातून अत्यंत खळबळजनक घटना समोर आलीय. एका विवाहितेवर तिचा सासरा, दीर अन् मामेभावानं अत्याचार केला. त्यानंतर तिच्यावर सपासप कोयत्यानं वार केला. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
Published : Sep 8, 2024, 10:22 PM IST
|Updated : Sep 8, 2024, 10:31 PM IST
ठाणे Gang Rape On Married Women : एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तिघंही नराधम पीडितेचे नातेवाईक असून यामध्ये पन्नास वर्षीय सासरा, 22 वर्षीय दीर आणि सोळा वर्षीय अल्पवयीन मामेभावाचा समावेश असल्याचं उघडकीस आलंय. या तिघांनीही पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केलं. सध्या पीडितेवर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळं ठाण्यात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.
- उत्तराखंड हादरले! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 कंडक्टरसह 2 चालकांकडून सामूहिक बलात्कार - Dehradun Gang Rape Case
- अग्निवीर जवानाचा मित्रांसह अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी उत्तराखंडमधून ठोकल्या बेड्या - Agniveer Soldier Gangraped A Girl
- भिक्षा मागणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Thane Crime News