महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सव 2024; गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील 'हे' महत्वाचे रस्ते राहणार बंद, भाविकांना घ्यावी खबरदारी - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आलीय. मुंबईतील काही रस्त्यांचं वन-वे आणि नो पार्किंगमध्ये रुपांतर करण्यात आलंय. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुमारे 50,000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

Ganeshotsav 2024
मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष व्यवस्था (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 9:08 AM IST

मुंबई Ganeshotsav 2024 :गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होतंय.गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी मुंबई वाहतूक पोलीसही सज्ज झालेत. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुंबई शहर पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आलीय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक रस्ते बंद करण्यात आले असून काही रस्त्यांचं वन-वे आणि नो पार्किंगमध्ये रुपांतर करण्यात आलंय.

5 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार : मुंबई शहरातील 82 रस्ते बंद करण्यात आले असून 13 रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. 93 रस्त्यांवर पार्किंग करता येणार नाही, तर 32 रस्त्यांवर अवजड वाहनं जाऊ शकणार नाहीत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. मुंबईत दरवर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी असते. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुमारे 50,000 पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच खासगी कर्मचारी, एनसीसी आणि होमगार्डचे जवान समुद्रकिनाऱ्यावर तैनात करण्यात येतील. तसंच संपूर्ण मुंबईत 5 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. याशिवाय राज्य सुरक्षा दल, बॉम्ब शोधक आणि निकामी पथकही गर्दीच्या ठिकाणी तैनात असतील.

'हे' रस्ते राहतील बंद :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही रस्ते वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात येणार आहेत. त्यातील मुख्य रस्ते सीपी टँक सर्कल ते भालचंद्र कंपनीपर्यंतचा व्हीपी रोड, कुंभार वाडा रोड, संत सेना रोड, दुसरी सुतार गली, नानू भाई देसाई रोड, गिरगाव रोड ऑपेरा हाऊस आहेत. येस बँक ते सिद्धिविनायक जंक्शन, केळुस्कर रोड पूर्णपणे बंद राहणार आहे. माहीम सायन लिंक रोड, कुंभारवाडा आणि धारावीला जोडणारा संपूर्ण टीएच कटारिया रोडही बंद असणार आहे. दादर टी. टी. ते कोतवाल गार्डन आणि टिळक रोड, डंकन कॉजवे ते सायन तलावापर्यंतचा रस्ता बंद राहील. विसर्जनाच्या वेळी जुहू तारा रोडवरील वाहतूकही बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा

  1. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात! 'राजा'चा पहिला लूक आला समोर; मुकुट ठरतोय चर्चेचा विषय - Ganesh Chaturthi 2024
  2. कोकणातील चाकरमान्यांना गणपती 'बाप्पा पावला'; राज्य सरकारनं केली मोठी घोषणा - Ganeshotsav 2024
  3. हातानं टाळ्या नाही, वाजवितात ढोल ताशा; महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथीयांचे पथक गणेशोत्सवाकरिता सज्ज - Transgenders Dhol Tasha Pathak

ABOUT THE AUTHOR

...view details