मुंबई Lalbaugcha Raja 2024: दरवर्षी गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) पाद्यपूजन होऊन लालबागच्या राजाचे "श्री गणेश मुहूर्त पूजन" आज (Ganesh Muhurat Pujan) संपन्न झाल्याची माहिती, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.
लालबागच्या राजाच्या श्री गणेशाचं मुहूर्त पूजन (Lalbaugcha Raja Mandal Mumbai)
गणेश मुहूर्त पूजन संपन्न : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश मुहूर्त पूजन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत पार पडले. खरं तर लालबागच्या राज्याच्या पाद्य पूजनानेच मुंबईतल्या गणेशोत्सवाची खऱ्या अर्थानं सुरूवात होते.
पावती पुस्तकांचे केले पूजन : लालबागच्या राजाच्या गणेश मुहूर्त पूजनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले. पावती पुस्तकाचे पूजन झाल्यानंतर देणगीदार, वर्गणीदार आणि हितचिंतक यांच्याकडून वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली जाते. लालबागच्या राजाचे भव्य दिव्य असे राजेशाही थाटमाट पाहण्यासाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस लाखो भाविक महाराष्ट्र सह महाराष्ट्राच्या बाहेरून देखील हजेरी लावतात.
संतोष कांबळी साकारणार गणेश मूर्ती : लालबाग परळ या गिरण गावातील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाला आज पासून 89 दिवस उरले असून लालबागच्या राजाच्या मूर्तीचे घडवण्याचं काम आजपासून सुरू केलं जात आहे. मूर्तिकार संतोष कांबळी लालबागच्या राजाची मूर्ती साकारत असून संतोष कांबळे यांचे वडील रत्नाकर कांबळे हे लालबागच्या राजाचे बोलके डोळे साकारण्याचे म्हणजेच लखाई काम शेवटच्या टप्प्यात पूर्ण करतात.
हेही वाचा -
- Ganesh Visarjan 2023: शिवरायांच्या उद्घोषात लालबागच्या राजाला भाविकांचा निरोप
- Ganeshostav 2023 : मुंबईच्या राजापुढं 'शिवराज्याभिषेक सोहळा'; कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरुन आणलीय माती... पहा व्हिडिओ
- Ganesh Visarjan २०२३ : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पाहा यंदाची राजाची शेवटची आरती