महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय; गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या - Gadchiroli Naxal

Gadchiroli Naxal Attack : पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेत गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या करण्यात आलीय. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणाची अधिकृत माहिती अद्याप गडचिरोली पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

Gadchiroli News One killed by Naxalites in Gadchiroli
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 12:49 PM IST

गडचिरोली Gadchiroli Naxal Attack :पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेत नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आरेवाडा इथं उघडकीस आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयराम गावडे असं मृताचं नाव असून तो देखील एकेकाळी नक्षलवादी होता. मात्र, 2016 ला त्यानं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो आरेवाडा इथं राहत होता. 25 जुलैच्या रात्री पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेत नक्षलवाद्यांनी त्याला उचलून नेलं. त्यानंतर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, ही घटना आज पहाटे उघडकीस आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details