महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदार प्रकाश गजभिये जम्मू-काश्मीरमध्ये अपघातात गंभीर जखमी, उपचार सुरू - PRAKASH GAJBHIYE

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांना २४ तारखेला जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात झाला. त्या अपघातात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत.

आ. गजभिये, सुप्रिया सुळे यांचे ट्विट
आ. गजभिये, सुप्रिया सुळे यांचे ट्विट (Etv Bharat reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 10:31 PM IST

नागपूर/श्रीनगर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) माजी आमदार प्रकाश गजभिये हे जम्मू-काश्मीर येथे झालेल्या एका अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात जम्मू काश्मिरमध्ये 24 जानेवारी रोजी घडल्याची माहिती पुढे आलीय. बर्फाचा मार डोक्याला लागल्यने प्रकाश गजभिये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जम्मू-काश्मीर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती नाजूक असल्यानं त्यांना एयर एम्बुलंसने दिल्लीला हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी देखील माहिती पुढे येत आहे.


माजी आमदार प्रकाश गजभिये हे शरद पवार यांचे नागपूर तसंच विदर्भातील विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्यात आलं होतं. नेहमी आगळे वेगळे आंदोलन करण्यासाठी ही त्यांना ओळखलं जातं. सर्व पक्षीय नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी नागपूरमध्ये धडकल्यानंतर त्यांचे समर्थक आणि नागपूरकर चिंतीत झाले आहेत. प्रकाश गजभिये यांच्या संदर्भात आणखी माहिती कुठे मिळेल याची चाचपणी त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी साधला ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क - माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा श्रीनगर येथे अपघात झाला असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते लवकर बरे होतील हा विश्वास आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी यासंदर्भात माझं बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं कार्यालय रुग्णालयाच्या संपर्कात आहे आणि सर्व प्रकारची मदत ते गजभिये कुटुंबीयांना करत आहेत. केलेल्या सर्व मदतीबद्दल ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या कार्यालयाचे मनापासून आभार सुप्रिया सुळे यांनी मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details