साताराFive persons arrested for stealing jewellery : लोकसभा निवडणूक निकालानंतर साताऱ्यात निघालेल्या भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सातारा, फलटण येथील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरट्यांनी लंपास केलेले 29 तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
समीर शेख यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) विजयी मिरवणुकीत चोरट्यांकडून हात सफाई : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील राजपथ ते पोवई नाका दरम्यान भव्य विजयी रॅली निघाली होती. या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लांबवल्या होत्या. त्यावेळी एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची चेन चोरीला गेली होती. तसंच आणखी 5 जणांच्या चेनही चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंद झाला होता.
सातारा बसस्थानक परिसरात चोरट्यांना पकडलं :पोलीस रेकॉर्डवरील सराईत चोरटे बाबासाहेब महादेव गायकवाड (रा. येळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), सचिन काळू पवार (रा. आनंदनगर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), नितीन शिवाजी धोत्रे (रा. नाथनगर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अर्जुन लक्ष्मण मासाळकर (रा. वाळूज, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) तसंच रामदास सोमनाथ घुले (रा. माळेगाव चकला, ता. शिरुर जि. बीड), अशी चोरट्यांची नावं आहेत. चोरट्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी रॅलीमध्ये लोकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्या होत्या. त्यामुळं चोरटे पुन्हा चोरटे सातारा बसस्थानक परिसरात वावरत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांना बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतलं. सातारा, फलटण शहरात देखील आणखी 3 गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.
चार गुन्ह्यांतील 29 तोळ्याचे दागिने हस्तगत : चार गुन्ह्यांत चोरीला गेलेले 20 लाख 66 हजार रgपये किंमतीचे 29 तोळ्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांकडून हस्तगत केले आहेत. याशिवाय 12 हजार रूपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली 7 लाख रूपये किंमतीची महिंद्रा स्कार्पिओ गाडीही जप्त केली आहे. दरम्यान, एलसीबीनं नोव्हेंबर 2022 पासून आजअखेर दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह अन्य चोरीचे 289 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये चोरीस गेलेले 4 कोटी 65 लाख 86 हजार रूपये किंमतीचे 6 किलो 662 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत केले आहेत.
'हे' वाचलंत का :
- उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन - उद्धव ठाकरे - Maharashtra assembly session
- या पठ्ठ्याच्या कमाईनं गाठले दीड हजार रुपयांपासून तब्बल 36 कोटी रुपये : जाणून घ्या अशफाक चुनावाला यांची कहाणी - Success Story Of Ashfaque Chunawala
- एसटी महामंडळाच्या बस सुविधेमुळं आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांना फायदा, चालकासह वाहकाचा घनदाट जंगलात मुक्काम - Melghat Bus facility