महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील गजबजलेल्या इतवारीत अत्तराच्या गोदामाला भीषण आग; एका तरुणीचा मृत्यू, तीन गंभीर - Nagpur Fire Accident - NAGPUR FIRE ACCIDENT

Nagpur Fire News : नागपूरच्या इतवारी परिसरात भीषण आग (Nagpur Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एका तरुणीचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Nagpur Fire Accident
अत्तराच्या गोदामाला भीषण आग (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 1:45 PM IST

नागपूर Nagpur Fire News :शहरातील अती गजबजलेल्या इतवारीच्या मुख्य बाजारपेठेतील अत्तराच्या गोदामाला (Perfume Warehouse) आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका तरुणीचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनुष्का बाखडे (17) असं आगीत होरपळून मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर तिचे आई-वडील, भाऊ हे देखील जखमी झाले आहेत.

इतवारीत अत्तराच्या गोदामाला भीषण आग (ETV Bharat Reporter)

शॉर्टसर्किटमुळं लागली आग : इतवारीतील खापरीपुरा परिसरातचं प्रवीण बाखडे यांच्या मालकीचे रेणुका नॉव्हेल्टी नावाचं दुकान आहे. तेथील दुकानाच्यावर ते कुटुंबासह राहतात. आज सकाळी संपूर्ण कुटुंब झोपलेलं असताना तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळं आग लागली. कुणाला काही कळण्यापूर्वी आगीनं संपूर्ण इमारतीला वेढलं होतं. त्यामुळं कुटुंबातील एक सदस्य जागा झाला. आग पाहून त्यानं एकचं आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून शेजारी राहणारे आजूबाजूचे लोक बाहेर आले. त्यानंतर तातडीनं घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.



चार लोकांना सुरक्षित बाहेर काढले :घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. गोडाऊनमध्ये अत्तर आणि चप्पल ठेवण्यात आले होते. प्लास्टिकच्या वस्तू असल्यानं आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण येत होती. त्याही परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान घरामध्ये पोहोचले आणि त्यांनी चार जणांना बाहेर काढलं.


मात्र अनुष्काला वाचवता आलं नाही :अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग नियंत्रणात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत प्रवीण बाखडे, त्यांची पत्नी प्रीती बाखडे, मुलगा सार्थक बाखडे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यावेळी अत्तरच्या गोडाऊनला आग लागली त्यावेळी घरामध्ये पाच सदस्य होते. त्यापैकी चार सदस्यांना अग्निशमन विभागाच्या पथकानं सुरक्षित बाहेर काढलं मात्र, अनुष्काला वाचवण्यात यश आलं नाही.

हेही वाचा -

  1. नागपूरच्या 'पेपर बोर्ड कंपनी'ला भीषण आग, नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू
  2. विको कंपनीतील आग भडकण्याचे कारण म्हणजे वॅक्स अन् अल्कोहोल, कंपनीचे ७० टक्के नुकसान
  3. नागपूर: एमआयडीसी परिसरात विको कंपनीला आग; अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details