महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीएला क्रिकेट सामना खेळणं पडलं महागात; डेबिट, क्रेडिट कार्डवरुन भामट्यानं केली लाखोची खरेदी - Fraud With CA In Mumbai - FRAUD WITH CA IN MUMBAI

Fraud With CA In Mumbai : क्रिकेट खेळायला गेलेल्या सीएचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड चोरुन भामट्यानं त्यावरुन लाखो रुपयांच्या दागिन्यांची खरेदी केली. या प्रकरणी सीएनं दाखल केलेल्या तक्रारीवरुन आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Fraud With CA In Mumbai
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 10:37 AM IST

Updated : Apr 3, 2024, 10:57 AM IST

मुंबई Fraud With CA In Mumbai :काळाचौकी पोलिसांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता चार्टर्ड अकाउंटंटला चोरट्यानं डेबिट आणि क्रेडिट कार्ड चोरुन 6 लाख 72 हजारांना चुना लावला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दिली आहे.

क्रिकेट सामना खेळणं भोवलं :चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या 28 वर्षीय विवेक नरेश दवे हे तक्रारदार असून ते खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली पूर्व येथे चार्टर्ड अकाउंटंट असलेले विवेक दवे आपल्या कुटुंबासह राहतात. 30 मार्च 2024 रोजी विवेक दवे कंपनीच्या कर्मचाऱ्यासह क्रिकेट सामन्यादरम्यान गेले असताना हा प्रकार घडला आहे. हा क्रिकेट सामना क्रॉस मैदानावर झाला, जिथं दिवसभराच्या खेळात व्यस्त असलेल्या विवेक दवेनं त्याचे फोन, पाकीट आणि बँक कार्ड्स यासह त्याचं सामान खेळाडूंसाठी असलेल्या तंबूत सोडलं होतं.

कार्डवरुन करण्यात आली सोनं खरेदी :दवे क्रिकेट सामन्यासाठी मैदानात असताना त्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे अनधिकृत व्यवहार झाल्याचे त्याला आढळलं. यामध्ये एटीएममधून एकूण 1 लाख इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले होते. या कार्डवरुन विविध स्टोअरमधून 5 लाख 72 हजार 111 किमतीच्या दागिन्यांची मोठी खरेदी करण्यात आल्याचं त्यांना आढळून आलं. जेव्हा दवेला कार्ड पिन बदललेला आणि त्यानंतरच्या व्यवहारांची माहिती देणारे भयानक संदेश प्राप्त झाले, तेव्हा दवे यांची झोप उडाली. हे सर्व त्या दुपारी घडले होते. या फसवणुकीमुळे कुलाबा परिसरातील प्रतिष्ठित ज्वेलर्सकडून रोख रक्कम काढली असून दागिने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

फसवणुकीची सायबर सेलकडं तक्रार :आपली फसवणूक झाल्याचं समजताच विवेक दवेनं त्याचे बँकिंग कार्ड ब्लॉक केले. घटनेची माहिती बँकेच्या ग्राहक सेवा आणि सायबर सेलला दिली. त्याच्या या तत्परतेमुळे त्यांनी एका ज्वेलर्सशी संपर्क साधला आणि त्या ज्वेलरी शॉपवाल्यानं संशयित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज दिले. महत्वाचे म्हणजे चोरानं सामन्यात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन गुन्हा केल्याचा निष्कर्ष काढून विवेकनं क्रिकेट सामन्यातून त्या व्यक्तीला ओळखलं. त्यासह विवेकनं आझाद मैदान पोलीस ठाण्यात तपशीलवार तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आझाद मैदान पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420, 419, 379 सह माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66 अ आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. सोनं विकायला गेले अन् दोन भाऊ बेपत्ता झाले; मुंबईत सराफा व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा लावला 'चुना' - Gold Theft In Mumbai
  2. विदेशात नोकरीच्या शोधात असाल तर सावधान! 65 हजार वेतन देऊन गुन्हे करायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Call Centre Fraud
  3. सायबर गुन्हे करण्याकरिता कर्मचाऱ्यांना पगारी ठेवून साडेचार कोटींची फसवणूक, देशाच्या सिलिकॉन व्हॅलीतील धक्कादायक घटना - cyber crime
Last Updated : Apr 3, 2024, 10:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details