महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; दोन चिमुरड्या मुलींनाही संपवलं - Wife Suicide Case - WIFE SUICIDE CASE

Wife Suicide Case : पती आणि सासरच्या जाचापायी एका विवाहितेने दोन मुलींना ठार मारले. यानंतर तिने स्वत: आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने मुलींसोबत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

Wife Suicide Case
आत्महत्या (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 7:07 PM IST

नाशिक Wife Suicide Case :पती आणि सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन मुलींना संपवून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने मुलीसोबत व्हिडिओ बनवला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमारतीवरून उडी मारून आत्महत्या :मिळालेल्या माहितीनुसार आडगाव परिसरात राहणाऱ्या शिल्पा (नाव बदललेले) या विवाहितेने पती आणि सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आपल्या सात आणि आठ वर्षांच्या दोन मुलींना ठार मारून स्वतःसुद्धा आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी घटना आडगाव पोलिसांना सांगितल्यानंतर आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिल्पाने आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्निल निकम त्याचा भाऊ आणि बहीण यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आहे.


काय आहे सुसाईड नोटमध्ये? :मी शिल्पा (नाव बदललेले) माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आत्महत्या करते. याला कारण माझा नवरा स्वप्निल जबाबदार आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींवरून स्वप्निल मला खूप त्रास देत आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या दोन मुलींसह आत्महत्या करत आहे. स्वप्निल यांच्या फॅमिली त्याचा भाऊ आणि त्याची बहीण यांच्याशी माझे भांडण झाल्यामुळे अचानक स्वप्निल भूतकाळात घडलेल्या गोष्टीवरून मला ब्लॅकमेल करून त्रास देतोय. म्हणून मी माझ्या मुलींना घेऊन आत्महत्या करत आहे. स्वप्निलने माझ्या आईकडून 6 लाख रुपये घेतले आहे आणि माझ्या मामाकडून 2 लाख रुपये घेतले आहे. ते त्याने परत द्यावे. माझ्या आणि मुलींच्या मृतदेहापासून पतीच्या कुटुंबाला दूर ठेवावे हीच माझी इच्छा आहे आणि त्याचा व्हिडिओ पण मी माझ्या मोबाईलमध्ये ठेवला आहे. माझा आणि मुलींचा अंत्यसंस्कार माझा भाऊ आणि आई हिने करावा. आम्ही तिघी या जगातून गेल्यावर हे पत्र गायब करण्यासाठी प्रयत्न होऊ शकते. माझा आणि माझ्या मुलींचा जीव घेणारा स्वप्निल, शंभू आणि ताऊ यांना शिक्षा मिळावी असं मृत शिल्पाने (नाव बदललेले) सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा :

  1. शरद पवारांनी फेकला नवा राजकीय बॉम्ब, उद्धव ठाकरेंची होणार का अडचण? - Sharad Pawar
  2. उद्धव ठाकरेंना भगवा ध्वज हातात...; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला - lok sabha election
  3. आमदार रवी राणांनी फुकटात नेल्या 70 हजार विटा; आमदारांवर अशी वेळ काय आली? - Allegation On Ravi Rana

ABOUT THE AUTHOR

...view details