बीड : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतय. असं असताना रात्री 12 वाजेच्या सुमारास अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान असलेल्या मुळुकवाडी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
देवदर्शनावरून येताना काळाचा घाला : मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण जेजुरीवरुन देवदर्शन करुन सोनपेठकडं जात होते. मुळुकवाडीजवळ असताना वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं समोर असलेल्या पुलाला गाडीनं जोराची धडक दिली. त्यामुळं गाडीचा (वाहन क्रमांक MH22 - AM 4571) चक्काचूर झाला. या अपघातात गाडीतील दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातादरम्यान मोठा आवाज आल्यानं परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमले. नागरिकांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
अहमदपूर-अहमदनगर मार्गावर भीषण अपघात (ETV Bharat Reporter) भरधाव एसटी बसनं तरुणांना उडवलं : काही दिवसांपूर्वीबीडवरुन परभणीकडं प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस क्रमांक MH-14 BT 1403 या बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना उडवल्याची घटना घडली होती. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्यानं ते बचावले. मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (speeding ST bus crushed 3 youth) झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, अनेकवेळा वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक प्रतिबंधन नियमन कायद्यानुसार दंड देखील आकारला जातो. मात्र, याची कुठलीही दखल वाहन चालक घेत नाहीत. त्यामुळं असे भीषण अपघात होताना पाहायला मिळतात. त्यामुळं वाहन चालकांनी वाहनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
हेही वाचा -
- राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाचा घेतला जीव, नेमका कसा घडला अपघात?
- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू
- अहमदनगर-अहमदपूर रोडवर कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात; 5 ठार