मुंबई Kshitij Zarapkar passed away : मराठी मनोरंजन विश्वातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते-दिग्दर्शक-लेखक अशा तिहेरी भूमिका चतुराईनं साकारणारे क्षितीज झारापकर यांचं निधन झालं आहे. क्षितीज झारापकर यांनी वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. आज (५ मे) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून क्षितीज झारपकर कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची या आजाराशी झुंज अखेर संपली आहे.
मनोरंजन जगतात झारापकरांचा दबदबा : 'टूर टूर', 'काला वजीर पांढरा राजा', 'सुंदरा मनानं भरली', 'सख्खे शिशिदी', 'ईच्छा माझी पुरी करा' या एकांकिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'लखात मी देखनी', 'सख्या सजना' या नाटकांच्या लेखन, दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अलीकडेच ते अस्ताद काळे तसंच अदिती सारंगधर यांच्यासोबत 'चार तर मीच' या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.