सांगलीFake currency notes factory busted:सांगली पोलिसांना गस्त दरम्यान बनावट नोटा विक्री करताना अहद शेख याला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्याकडून बनावट नोटांची छपाई करून विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शहर पोलिसांनी मिरज शहरातल्या शेख याच्या घरावर छापा टाकत बनावट नोटांची छपाई करणाऱ्या मशीनसह 50 रुपयांच्या 1 लाख 90 हजारांच्या बनावट नोटा असा 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख याच्याकडून 50 रुपयांच्या बनावट नोटा छापून विक्री करण्यात आल्या. याची व्याप्ती मोठी असल्यानं आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता सांगली पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
झटपट श्रीमंतीसाठी अवलंबला 'हा' मार्ग : अनेकवेळा डिजिटल फ्रॉड करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्याच्या घटना आपल्या कानावर येतात. त्यामुळे आता त्यापेक्षाही पुढे जाऊन चक्क आपली स्वतंत्र अवैध बँक किंबहुना अमाप पैसा विना परिश्रम छापण्याचे विचार समाजात वाढत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या काळात झटपट श्रीमंत होण्याची इच्छा आणि झगमग राहणीमानाच्या हव्यासापोटी तरुण पिढी आणि काही गुन्हेगार बनावट चलन छापण्याच्या मार्गाकडे वळत आहेत. अशातच बुलढाण्यात चक्क बनावट नोटा छापण्याची मशीन पोलिसांनी जप्त केल्यानंतर सर्वजण अवाक् झाले. आता सांगली जिल्ह्यात अगदीच छोट्याशा जागेत असे उद्योग करताना एकजण सापडल्यानं पोलिसांचं काम वाढलं आहे.