मुंबई Ambadas Danve On Education Plans : राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा ( Deadline For Education Plan Feedback) तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी आणि परिपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्याकरीता मुदत वाढ द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडं पत्राद्वारे केलीय.
राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार : राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण विभाग आणि मुंबई विभाग या विभागातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. त्यामुळं सदर आराखड्यातील त्रुटींवर अधिक चांगलं काम करता येईल आणि एक परिपूर्ण आराखडा तयार करण्यास मदत होईल. याबाबतची वस्तूस्थिती पाहता शैक्षणिक विभागानं नागरिकांना अभिप्राय देण्यास दिलेला कालावधी कमी असल्याचं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे.