नागपूरNishant Agarwal Case : शत्रूच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याला ब्रह्मोस मिसाइल हेरगिरी प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये शास्त्रज्ञ निशांत अग्रवालला हेरगिरीच्या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली होती. पाकिस्तानी एजंट्सच्या हनीट्रॅपमध्ये अडकवून निशांत यांनी ब्रम्होस मिसाईल विषयी माहिती पुरवली होती, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर निशांत अग्रवालवर नागपूरच्या विशेष सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. कलम तीन आणि पाच ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार आरोपी निशांत अग्रवालला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.
घरावर धाड टाकून केली होती अटक :ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवण्याच्या प्रकरणात निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरीत्या नागपूरच्या उज्वल नगर परिसरात भाड्याने राहत असलेल्या निशांत अग्रवालच्या घरावर धाड टाकत अटक केली होती. त्यानंतर निशांत अग्रवालच्या विरोधात शासकीय गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप होता.