पुणे Essay Competition On Pune Accident : पुण्यातील कल्याणी नगर येथे मागच्या रविवारी मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयाने काही अटींवर जामीन दिला होता. त्यात त्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. याच्याच निषेधार्थ आज (26 मे) युवक काँग्रेसच्यावतीनं कल्याणी नगर येथील त्या अपघातस्थळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
'हे' होते निबंधाचे विषय :युवक काँग्रेसच्यावतीने कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या घटनास्थळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माझी आवडती कार (पोशें, फरारी, मर्सडिज, की इतर), दारूचे दुष्परिणाम, नियम पाळा, अपघात टाळा, अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे, आजची तरुण पिढी अन् व्यसनाधीनता, माझा बाप बिल्डर असता तर? रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे? मी पोलीस अधिकारी झालो तर?, भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का?, अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण? माझ्या स्वप्नातील पुणे शहर /असं असावं माझं पुणे शहर, अशा विविध विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास 11 हजार, द्वितीय येणाऱ्यास 7777 आणि तिसऱ्या क्रमांकाला 5555 रुपये बक्षीस ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपलं मत मांडलं.