महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी आल्या रिकाम्या बस; पाहा व्हिडिओ - PM Narendra Modi - PM NARENDRA MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. मोदींनी ठाण्यात विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. मात्र, तेथील सभेसाठी बस रिकाम्याच आल्या.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी आल्या रिकाम्या बसेस (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 3:46 PM IST

Updated : Oct 5, 2024, 5:31 PM IST

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी विविध प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं परिवहन सेवेच्या 'टीएमटी' बस सभेसाठी वळवल्या होत्या. मात्र त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. सभेला घेवून येण्यासाठी पाठवलेल्या या बस रिकाम्याच आल्या.

नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन : अनेक कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आहेत. मोदींनी शनिवारी सायंकाळी ठाण्यातील तब्बल 32 हजार 800 करोड रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यानंतर त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सभेसाठी गर्दी करण्याचं टार्गेट मात्र पूर्ण झालं नाही. संपूर्ण 'एमएमआरडीए' आणि राज्यभरातून महिलांना सभेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, या सभेला महिलांकडून प्रतिसाद मिळाला नाही. या बस रिकाम्याच सभेच्या ठिकाणी पोहचल्या होत्या. या सर्व रिकाम्या बस 'ईटीव्ही भारत'च्या कॅमेऱयात कैद झाल्या आहेत.

मोदींच्या सभेसाठी आल्या रिकाम्या बसेस (ETV Bharat Reporter)

सभेसाठी महिलांकडून प्रतिसाद नाही : सभा आणि गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाण्यात सभा झाली. या सभेसाठी गर्दी होईल, अशी अपेक्षा भाजपाच्या नेत्यांना होती. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांना कामाला लावण्यात आलं होतं. सभेला येणाऱयांसाठी मोफत बस सेवा पुरवण्यात आली होती. असं असताना देखील महिलांकडून सभेसाठी प्रतिसाद मिळत नाही. यामुळं कुठंतरी परिणाम हा सभेतल्या गर्दीवरती झाल्याचं दिसुन आलं. मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा करण्यात आली होती. मात्र, गर्दी होत नसल्यामुळं आयोजक कुठेतरी हतबल झाल्याचं दिसत आहे.

सर्वसामान्यांचे मात्र हाल : राज्यभरातल्या अनेक बस या कार्यक्रमासाठी ठाण्यात आणल्या होत्या. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील अनेक खासगी बस या सभेसाठी आणल्या होत्या. त्यामुळं तेथील सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळ नेहमीची सेवा बंद करून या बस सभेसाठी वळवण्यात आल्या होत्या. मात्र, या असुविधेचा फटका सर्वसामान्यांना बसला.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदींकडून नंगारा भवनाचं उद्घाटन, बंजारा समाजाच्या 'काशी'त वाजवले नगारे - PM NARENDRA MODI SPEECH IN WASHIM
  2. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता खात्यावर जामा होणार - PM Kisan Samman Nidhi
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार उद्घाटन, 'असा' असेल संपूर्ण दौरा - PM Modi Maharashtra Visit
Last Updated : Oct 5, 2024, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details