महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; वडेट्टीवार, बावनकुळे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल - Code Of Conduct Violating Issue - CODE OF CONDUCT VIOLATING ISSUE

Code Of Conduct Violating Issue : आक्षेपार्ह वक्तव्य आणि जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 614 कोटी रुपयांची मालमत्ता आचारसंहिता कायद्याअंतर्गत जप्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Code Of Conduct Violating Issue
वडेट्टीवार, बावनकुळे (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 10:58 PM IST

मुंबईCode Of Conduct Violating Issue:लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याचे मतदान येत्या 13 तारखेला होणार आहे. या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघांच्या मतदानाचा समावेश आहे. यासाठी 23284 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून यापैकी 83 मतदान केंद्रे संवेदनशील आहे तर 298 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली. या टप्प्यात एकूण 2 कोटी 28 लाख 1151 मतदार आपला हक्क बजावणार असून यापैकी एक कोटी 18 लाख 59 हजार 645 पुरुष मतदार तर 1 कोटी 9 लाख 40 हजार 234 महिला मतदारांचा समावेश असणार आहे. तर दहा हजार सहाशे दिव्यांग मतदारांनी मतदान 10 डी अर्ज भरला आहे. या टप्प्यातील मतदानाबाबतची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली असून पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठीही एक बैठक मुंबईत घेण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


पाचव्या टप्प्यासाठी आढावा बैठक :लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासंदर्भात आढावा बैठक नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात पार पडली आहे. या टप्प्यात महामुंबईसह दिंडोरी, नाशिक, पालघर या मतदारसंघांचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण उमेदवारांची संख्या 2 कोटी 46 लाख 69 हजार 544 इतकी आहे. त्यापैकी 1 कोटी 31 लाख 38 हजार 526 इतके पुरुष मतदार तर 1 कोटी 15 लाख 28 हजार 278 इतक्या महिला मतदारांची संख्या आहे. 2740 तृतीयपंथी मतदारांची संख्या ही यात समाविष्ट आहे. एकूण 24 553 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

वडेट्टीवार आणि बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल :काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कसाबच्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला नव्हता, असे धक्कादायक विधान केले होते. या विधानाबद्दल नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपाने विजयानंतर फटाके भारतात वाजवणार की पाकिस्तानात या जाहिरातीबद्दल ठाणे येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती एस चोकलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामती येथील पैसे वाटपाच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून जिल्हाधिकारी स्तरावर याबाबत गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

614 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त :1 मार्च ते 10 मे पर्यंत राज्यात आचारसंहिता भंगाचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणेद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग आणि मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. यात 58 लाख 34,106 लिटर दारू 45 कोटी रुपये किमतीची आहे ती जप्त करण्यात आली आहे. रोख रक्कम 59 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर 162 कोटी रुपये किमतीच्या 22 लाख 6,705 ग्रॅम मौल्यवान धातूच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. 51 हजार 284 फ्रीबीज वस्तू तर इतर सुमारे 101 कोटी रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा:

  1. छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 12 नक्षलवाद्यांचा खात्मा - encounter in pedia forests
  2. तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल आक्रमक; म्हणाले, "देशाला हुकूमशाहीपासून..." - Interim Bail To Arvind Kejriwal
  3. खासदार अमोल कोल्हेंचा मतदानापूर्वी 'मोठा डाव'; केली 'ही' मोठी घोषणा - lok sabha election

ABOUT THE AUTHOR

...view details