मुंबईAnil Parab On Election Commission:मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून निवडणूक आयोगावर ठाकरे गटाने काही गंभीर आरोप केले आहे. आता निवडणूक आयोगाने जाणून बुजून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचा आरोप ॲड. अनिल परब यांनी करताना मुक्त आणि पारदर्शक निवडणुका या तत्त्वाला हरताळ फासल्याचे म्हटले.
निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली :शिवसेनेच्या (ठाकरे) शिष्टमंडळाने खासदार अनिल देसाई नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला एक निवेदन दिले. देसाई यांच्या सोबत अनिल परब आणि आमदार विलास पोतनीस उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत परब म्हणाले कि, पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेनेने जी नावे नोंदवली होती त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. त्यांनी फॉर्म स्वीकारल्याच्या पोच पावत्या आमच्याकडे आहेत. ज्यावेळेस फॉर्म दिला जातो. त्यावेळेस तो तपासूनच त्याची पोचपावती दिली जाते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पोच पावती येते. ज्यावेळेस पोच पावती दिली जात नाही त्यावेळेस तो फॉर्म नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. फॉर्म नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे; मात्र यावेळेस फॉर्म स्वीकारून ही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. त्यामुळे यात खूप मोठी गडबड असल्याचा संशय परब यांनी घतला. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचाही आरोप ॲड. अनिल परब यांनी केला. आम्ही नोंदवलेली नावे आली नसली तरी सत्ताधारी पक्षाने जी नावे दिलेली आहेत ती मात्र सर्वच्या सर्व पुरवणी मतदार यादीत आलेली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग हे जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाच्या निर्देशाखाली काम करत आहे असं वातावरण तयार झाले आहे, असा आरोप परब यांनी केला.