महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घर ते वर्षा व्हाया रुग्णालय; एकनाथ शिंदेंचं चाललंय तरी काय?

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयात गेले होते. रुग्णालयाकडं निघताना त्यांनी "माझी तब्येत ठीक आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde Went To Hospital
एकनाथ शिंदे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 1:52 PM IST

Updated : Dec 3, 2024, 7:31 PM IST

ठाणे/मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात जाताना एकनाथ शिंदे यांनी आपली तब्येत ठीक आहे, असं उपस्थित माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.

वर्षावर घेतली बैठक : मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले. सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बैठक घेण्यासाठी ते वर्षा निवासस्थानी आले. शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी राहुल शेवाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी जुपिटर रुग्णालयामध्ये आले होते.

डॉक्टरांनी दिली माहिती (Source : ETV Bharat Reporter)

डॉक्टरांनी दिली माहिती : या संपूर्ण तपासणीबाबत ज्युपिटर रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर अजय ठक्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "एकनाथ शिंदे यांची तब्येत अगदी ठीक आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. दैनंदिन तपासणीसाठी ते जुपिटर रुग्णालयात आले होते. तपासणीत सिटी स्कॅन, एमआरआय, थॉट टेस्ट आणि ब्लड टेस्ट अशा विविध तपासण्या करण्यात आल्या."

एमआरआय चाचणी करण्यात आली : तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयातून थेट वर्षावर दाखल झाले. तब्येत ठीक असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे यांची एमआरआय तपासणी करण्यात आली. घशाच्या संसर्गामुळं ते रुग्णालयात आले होते. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आल्याची माहिती ज्युपिटर रुग्णालयाचे एमडी डॉ. अजय पी ठक्कर यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

तब्येत ठीक - शिंदे :आरामासाठी एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील मूळ दरे गावी गेले होते. तेथून मुंबईत आल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. ते आज घराबाहेर निघाले. त्यांनी थेट रुग्णालय गाठलं. मागील काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. तपासणीनंतर डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट निगेटिव्ह आली होती.

घशाचे इन्फेक्शन झाल्यानं त्रास :घशाचे इन्फेक्शन आणि सर्दी, ताप यामुळे एकनाथ शिंदे हे मागील चार दिवसांपासून आजारी होते. दरे या त्यांच्या गावी गेल्यावर त्यांना आणखी त्रास वाढला. तेव्हा तेथील डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर ठाण्यात आल्यावर ज्युपिटर रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्यावर घरीच उपचार करत होते. काल त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं होतं. त्यांचं सिटी स्कॅन आणि एमआरआय करण्यात आलं आहे. तसेच रक्त तपासणीदेखील करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सकाळपासून आमदारांची रीघ : सोमवारपासूनच एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आमदारांची रीघ लागलेली होती. मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे अनेक आमदारांना शिंदे यांना भेटता आले नाही. मात्र, शिंदे हे भाजपाचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांना भेटले. शपथविधी दोन दिवसांवर आला असताना शिंदे हे आजारी आहेत. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना! मुंबई दौऱ्यापूर्वी विजय रुपाणी काय म्हणाले?
  2. मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित नाही, तरीसुद्धा महायुतीतील नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी
  3. भाजपा काँग्रेसमुक्त भारत करता करता प्रादेशिक पक्षमुक्त भारत करू पाहतंय का?
Last Updated : Dec 3, 2024, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details