महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाडक्या बहिणींना विरोध करणारे सावत्र भाऊ- मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर सोडला बाण - Eknath Shinde Attack On Thackeray - EKNATH SHINDE ATTACK ON THACKERAY

Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे शरद पवारावंर टीकेची झोड उठवलीय. ते आज छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये बोलत होते.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 10:39 PM IST

छत्रपती संभाजीनगर Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray :"माझी लाडकी बहीण तसंच माझा लाडका भाऊ योजनेवर विरोधकांनी कितीही टीका केली, तरी या योजना बंद होणार नाही. त्यामुळं विरोधक तुमचे सावत्र भाऊ आहेत. त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा," असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केलाय.

पैसे रक्षाबंधनापूर्वीच जमा होणार :"या महिन्यात नोंदणी केल्यास दोन महिन्यांचे पैसे रक्षाबंधनापूर्वी बहिणींच्या खात्यात जमा होतील. यासाठी सरकारनं 45 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळं कुठंतरी मोठी आग लागली आहे. वेदनाशामक क्रीमची मागणी वाढली आहे. त्याचा तुटवडा आता राज्यात जाणवू लागला आहे. अनेकांना पोटदुखीचा त्रास होत असल्यानं ते संपवण्याची भाषा वापरत करत आहेत," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथील जाहीर कार्यक्रमात केली.

माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ :राज्यात माझी लाडकी बहीण योजनेचा जाहीर शुभारंभ सिल्लोड तालुक्यातून करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात हजारो महिलांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला. यावेळी योजनेच्या अनुषंगानं त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यात मोठमोठ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळं अनेकांना पोटदुखी झाली आहे. आता जनता आमच्या पाठीशी उभी राहील, याची भीती त्यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मत मिळवली. आता ते होणार नाही, याची भीती विरोधकांना वाटत आहे. ही योजना चालणार नाही, बंद पडेल अशी टीका विरोधक करत आहेत."

योजनेसाठी निधीची तरतूद-पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले," लाडक्या बहीण योजनेत 45 हजार कोटींची तसंच लाडका भाऊ योजनेत 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात महिला अर्ज करत आहेत. त्यामुळं विरोधक घाबरले आहेत. आधी टीका करणारे आता आपल्याच कार्यालयासमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, असे बॅनर लावताना दिसत आहेत. मात्र, महिलांनी अधिकृत सेतू सुविधा केंद्रावरच अर्ज केले पाहिजे. नाहीतर केलेले अर्ज हे फाडून आमच्यावर नाव घेतील. आमची देण्याची नियत आहे. आमचा इरादा नेक असून आमची लेक सुरक्षित राहणार, असा आमचा नारा आहे."

राज्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न : "राज्य समृद्ध ठेवण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करत आहोत. मराठवाड्याची दुष्काळवाडा असलेली ओळख आता विसरायची आहे. वॉटर ग्रीड योजना महाविकास आघाडीनं बंद केली होती. ती योजना पुन्हा एकदा सुरू करायची आहे. नदीजोड योजनादेखील सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पंतप्रधानांनी हिरवा कंदिल दिलाय. या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग येणार आहेत. लोकांना घरी बसणारे लोक चालत नाही. मी स्वतः अनेक ठिकाणी जातो. लोकांचं दुःख ऐकायला पाहिजे. त्यामुळं खोट्या प्रचाराला बळी पडू नका. काही झालं तरी योजना बंद होणार नाही. कुठल्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात नोंदणी केली, तरी दोन महिन्याचे पैसे जमा होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. "ये तो अभी झाकी, है दो माह अभी बाकी आहे" असं डॉयलॉग एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटला.

मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड दौऱ्यावर असताना त्यांचा भव्य रोडशो काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी एका इमारतीवर उभे राहून मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर द्या, ओबीसीमध्ये समावेश करा, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. मुख्यमंत्री तिथून पुढं गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

'हे' वाचलंत का :

  1. "मी जया अमिताभ बच्चन...", ऐकून सभापती मोठ्यानं हसले, जाणून घ्या सभागृहात नेमकं काय घडलं? - Jaya Bachchan in Rajya Sabha
  2. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics
  3. का रे दुरावा? गंभीर आरोपांच्या फैरीनंतर फडणवीस-देशमुख एकाच मंचावर,पण... - Devendra Fadnavis vs Anil Deshmukh

ABOUT THE AUTHOR

...view details