मुंबई :विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या नियुक्तीबाबत सुरू असलेला गोंधळ त्वरित संपवावा, अशी मागणी शिवसेनेनं याचिकेत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते गोपीकिशन बजोरिया यांनी याप्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय.
12 आमदारांची निवड प्रलंबित :विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत बाजोरिया यांनी दाखल केलेल्या याचिकेची खंडपीठानं दखल घेतली. खंडपीठानं पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 आमदारांची निवड प्रलंबित आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात या नियुक्त्यांची घोषणा केली नव्हती. तेव्हापासून या नियुक्त्यांवरून वाद सुरू झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेवर आलंय. आता विधानसभेचा कार्यकाळ संपत असताना या 12 आमदारांची अद्याप नियुक्ती न झाल्यानं महाआघाडीच्या सरकारमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. त्यामुळं ही सुनावणी तातडीनं घेऊन निर्णय द्यावा, अशी त्यांनी उच्च न्यायालयाला केलीय.