महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट इडीने घेतला ताब्यात - IQBAL KASKAR

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या ठाण्यातील ‘नियोपोलीस’ टॉवरमधील फ्लॅट ईडीने ताब्यात घेतला आहे.

Mumbai ED Seized Iqbal Kaskar Flat
इकबाल कासकरचा फ्लॅट इडीने घेतला ताब्यात (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 3:49 PM IST

ठाणे :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरवर खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी यापूर्वी ईडीने सील केलेला फ्लॅट आज ताब्यात घेतला आहे. या फ्लॅटची किंमत ७५ लाखांच्या आसपास असल्याची माहिती आहे.


फ्लॅटचं सील तोडून घरात केला प्रवेश: इकबाल कासकरवर ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेत गुन्हा दाखल होता. खंडणी, धमकावणे, मनी लॉन्ड्रिंग आणि विविध गुन्ह्यांमध्ये इकबाल कासकर सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईडीने सील केलेला फ्लॅट कासकरच्या फॅमिलीने १५ दिवसांपूर्वी सील तोडून घरात प्रवेश केला होता अशी माहिती इमारतीतील सदस्यांनी दिली.

इकबाल कासकरचा फ्लॅट इडीने घेतला ताब्यात (ETV Bharat Reporter)

ईडीने सील केला होता फ्लॅट :सन २०१७ ला इकबाल कासकरने हा फ्लॅट बिल्डर सुरेश मेहता आणि त्याची फर्म दर्शन एंटरप्राईजेसला धमकावून घेतला होता. सदर फ्लॅट हा घोडबंदर रोड येथील कावेसर मधील 'नियोपोलीस' टॉवरमध्ये आहे. त्यानंतर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणी, धमकावणे आधीचा तपास हा ठाणे गुन्हे शाखेद्वारे करण्यात आला. तर मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास हा ईडीद्वारे केला होता. त्यावेळी या प्रकरणात फ्लॅट घेतल्याचं समोर आलं होतं. तेव्हा ईडीने फ्लॅट सील केला होता.



फ्लॅटचे सील तोडून केला प्रवेश : ईडीने जप्त केलेला आणि सील केलेला फ्लॅट अनेक वर्ष बंद होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी सील केलेल्या फ्लॅटचे सील तोडून इकबाल कासकर यांच्या कुटुंबीयांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याची माहिती, ईडीला मिळाली होती. त्यामुळं सदर फ्लॅट हा मंगळवारी ताब्यात घेण्यात आला. सध्या इकबाल कासकर आणि त्याचे साथीदार हे पोलिसांच्या ताब्यात असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा सखोल तपास ईडी करत आहे.

हेही वाचा -

  1. दाऊदचा भाऊ इकबल कासकरची खंडणी प्रकरणातून मुक्तता - Iqbal Kaskar
  2. दाऊद इब्राहिमची जमीन खरेदी करणारा सनातनी; 'तेथे' सनातनची शिकवण देणारी शाळा उभारणार
  3. खंडणी वसूल करणाऱ्या इम्रान कालियाचं निघालं दाऊद इब्राहिम कनेक्शन, 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Mumbai Crime Branch

ABOUT THE AUTHOR

...view details