महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील ड्रग्ज फॅक्टरीवर डीआरआयची छापेमारी, 78 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त - Raids On Drugs Factory - RAIDS ON DRUGS FACTORY

Raid On Drugs Factory in Nagpur : नागपूरच्या पाचपावली परिसरात ड्रग्ज बनविणाऱ्या फॅक्टरीवर मुंबईच्या 'डीआरआय' पथकाने आज (11 ऑगस्ट) छापा टाकला. यावेळी पथकाकडून 52 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. तिघांना अटक करण्यात आली आहे.

Raids On Drugs Factory
ड्रग्जच्या फॅक्ट्रीवर धाड (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 10:58 PM IST

Updated : Aug 12, 2024, 9:45 AM IST

नागपूर Raid On Drugs Factory in Nagpur: नागपूरच्या पाचपावली परिसरातून ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ७८ कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. डीआरआयच्या छापा कारवाईत द्रव्य स्वरूपातील 52 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) ही कारवाई नागपूरच्या पाचपावली परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणी मास्टरमाईंड आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना डीआरआयने अटक केली आहे.

आरोपींनी सुसज्ज प्रयोगशाळाच उभारली :नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एक बांधकामाधीन इमारतीत मेफेड्रोनचे (एमडी) गुप्तपणे उत्पादन होत आहे, अशी माहिती 'डीआरआय'ला मिळाली होती. त्यावरून 10 ऑगस्ट रोजी डीआरआयकडून छापेमारीची मोहीम राबविण्यात आली. मेफेड्रोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेली एक छोटी प्रयोगशाळा पाचपावली परिसरात एक बांधकामाधीन इमारतीत उभारण्यात आल्याचं छापेमारीदरम्यान समोर आले. मास्टरमाइंडनं प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला. त्यानंतर सेटअप केला. 100 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा मालदेखील आरोपींनी जमा केला होता.


कच्चा माल, उपकरणे जप्त :सिंडिकेटनं आधीच द्रव स्वरूपात 50 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते. क्रिस्टलाइज्ड तसेच पावडर स्वरूपात उत्पादन बाहेर आणण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. सुमारे 78 कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले आहे. तसेच कच्चा माल आणि उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत मेफेड्रोन हा सायकोट्रॉपिक पदार्थ आहे. सिंडिकेटचा मास्टरमाइंड किंवा फायनान्सर आणि एमडी बनवणाऱ्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस कायदा, 1985च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान डीआरआय पथकाला नागपूर पोलिसांनी देखील सहकार्य केले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा:

  1. शहानिशा न करता फ्लॅट देणं आलं अंगलट, भाडेकरू तस्कर निघाल्यानं घरमालकावरच गुन्हा दाखल - Drug Smuggling Case Bhiwandi
  2. एनसीबीची मोठी कारवाई! ड्रग्ज तस्कराला सायन सर्कलहून अटक; 10 कोटींचं 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त - Drug Smuggler Arrested
  3. मुंबई पोलिसांची जोधपूरमध्ये ड्रग्ज कारखान्यावर धाड, 100 कोटींहून अधिक किमतीचं ड्रग्ज जप्त - Drugs Factory Busts In Jodhpur
Last Updated : Aug 12, 2024, 9:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details