मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने 9.67 किलो तस्करीचे सोने, 18.48 किलो चांदी, 1.92 कोटी भारतीय चलन आणि 190000 उद डॉलर्स जप्त केले आहेत, अशी माहिती डीआरआयचे अधिकारी प्रवीण जिंदाल यांनी दिली आहे. डीआरआयनं रोख रकमेसह एकूण दहा कोटी 48 लाखांचे सोने-चांदी जप्त केले आहेत.
सोने तस्करीच्या कारवाईत डीआरआयच्या हाती घबाड, झवेरी बाजारातून कोट्यवधींच्या रकमेसह 18.48 किलोसह 9.67 किलो चांदी जप्त - DRI raid zaveri bazar - DRI RAID ZAVERI BAZAR
मुंबईच्या डीआरआय विभागानं सोने तस्करीत मोठी कारवाई केली आहे. झवेरी बाजारातून कोट्यवधी रुपयांचे सोने, तस्करीसह रोख रक्कम जप्त केली आहे.
Published : Apr 24, 2024, 10:40 AM IST
|Updated : Apr 24, 2024, 10:46 AM IST
आफ्रिकेतून तस्करी केलेले सोने हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून आणण्यात आले होते. त्यावरील परदेशी मार्किंग घालवण्यासाठी मुंबईतील एका बाजारपेठेत वितळवण्यासाठी आणले जात असल्याची डीआरआयला गुप्त माहिती मिळाली होती. आफ्रिकेतून तस्करी करून आणलेले सोने वितळवून त्यावरील परदेशी मार्किंग काढून ते स्थानिक बाजारात वळवले जात असल्याचे माहिती डीआरआयला मिळाली. त्या आधारावर 22 एप्रिलला ही कारवाई करण्यात आली आहे.
डीआरआयच्या मुंबई झोन युनिटच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत वितळवण्याच्या सुविधा उघडकीस आल्या आहेत. त्यात 9. 31 किलो सोने जप्त करण्यात आले. हे जप्त केलेले सोने वेगवेगळ्या स्वरूपात असून त्यात विदेशातील सोन्याचादेखील समावेश आहे. तसेच 16.66 किलो चांदी देखील जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाई तस्करी केलेले सोने गोळा करणारी व्यक्ती आणि परदेशी सोने वितळवण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती डीआरआयच्या रडारवर आहेत.
काही व्यक्तींची तस्करी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. ते आफ्रिकन नागरिकांशी संपर्क साधून सोने तस्करी करतात. तस्करी करून जमा केलेल्या सोन्याची वितळवून प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते स्थानिक खरेदीदारास सुपूर्द केले जाते. डीआरआयनं या तस्करी संदर्भात पाठपुरावा करून तस्करीचे सोने गोळा करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यालयामध्ये छापेमारी केली. त्यांच्याकडून एक लाख 90 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. हे परदेशी चलन एका स्थानिक खरेदीदाराने तस्करीचे सोने खरेदी करण्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट म्हणून दिल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.
हेही वाचा-