महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बॅनरवरील धनुष्यबाण चिन्ह फाडल्यानं शिंदे गट आणि उबाठा गटात राडा : 'बॅनर फाडताना रंगेहात पकडलं' - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray - EKNATH SHINDE VS UDDHAV THACKERAY

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. प्रभादेवी इथं लावलेल्या बॅनरवरुन शिवसेनेचं धनुष्य बाण चिन्ह काढताना उबाठा गटाच्या कार्यकर्त्याला रंगेहात पकडण्यात आलं, असा दावा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर शिवसेना आणि उबाठा गटातील वाद उफाळून आला.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 10:29 AM IST

मुंबई Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : प्रभादेवी इथं फुटपाथवर लावलेल्या बोर्डावरील धनुष्यबाणाचं चिन्ह उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काढल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरुन उबाठा आणि शिंदे गट आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. याप्रसंगी शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. याबाबत शिंदे गटाचे माहीम विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी पोलिसात यापूर्वी तक्रार सुद्धा केली होती.

शिंदे गट आणि उबाठा गटात राडा (Reporter)

धनुष्यबाण काढताना रंगेहात पकडलं :प्रभादेवी, रवींद्र नाट्य मंदिराशेजारील फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह मंगळवारी रात्री उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काढलं. यावरुन शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. यानंतर दोन्ही गटाचे पदाधिकारी आमने-सामने आले आल्यानंतर दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला. फुटपाथवर लावण्यात आलेला हा बोर्ड शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या स्वखर्चातून लावण्यात आल्याचा दावा शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केला. होर्डिंगवरील धनुष्यबाणाचं चिन्ह कापून तिथून पळ काढताना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं असल्यानं हा वाद चिघळला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विविध योजनांची माहिती देण्यासाठी बोर्ड : माहिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येक रस्त्यांच्या पदपथावरील कोपऱ्यावर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चानं धनुष्यबाण चिन्ह असलेले लोखंडी बोर्ड बसवले आहेत. या बोर्डावर विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत असते. परंतु या बोर्डांचा इतर राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याकडून गैरवापर होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे माहिम विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी यापूर्वीही केला आहे. याबाबत त्यांनी अनेकदा पोलिसात तक्रारही केली होती. पण पोलिसांकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नव्हती.

माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा :रात्री घडलेल्या या प्रकरणात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर धावून आल्यानं इथलं वातावरण चांगलंच तापलं. होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह का काढलं? याबाबत शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार जाब विचारला जात होता. परंतु उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही. तर "उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच बोर्डावरुन धनुष्यबाण हटवलं जात आहे," असा आरोप शिंदे गटाकडून केला गेला. अखेरकार "शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्दे यांच्यासह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. 'आमचा पक्ष शिवसेनाच' : निवडणूक आयोगाकडं आम्ही जमा खर्च कशाचा सादर करावा? - Uddhav Thackeray
  2. पोलिसांचा बंदोबस्त हटवला तर संजय राऊतांचा डाऊट दूर करू; संजय गायकवाड यांची शेलक्या शब्दात टीका - Sanjay Gaikwad On Sanjay Raut
  3. आमदार अपात्रतेचा निर्णय निवडणुकीपर्यंत लागेल - घटनातज्ञ उल्हास बापट - Constitutional Expert Ulhas Bapat

ABOUT THE AUTHOR

...view details