पालघर Narendra Modi Fans: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट दिलीप पटेल (Dilip Patel) यानं लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा टॅटू एका युवकाच्या पाठीवर काढलाय. त्यातून मोदी यांच्या क्रियाशील वर्तणुकीचा संदेश देण्यात आलाय. ग्रामीण भागातील युवकातही मोदी किती लोकप्रिय आहेत, हे या घटनेवरून लक्षात येतंय.
भारताच्या नकाशात रेखाटलं मोदींचं चित्र (ETV BHARAT Reporter)
श्रीरामाचे टॅटू आणि चित्र काढले मोफत : पटेल हा डहाणू येथील युवक असून तो गेल्या काही वर्षांपासून दर मंगळवारी आणि शनिवारी श्रीरामाचे टॅटू, चित्र मोफत काढून देतो. आत्तापर्यंत त्यानं अशा प्रकारे हजारो लोकांच्या हातावर टॅटू, चित्र काढून दिलंय. हिंदू धर्मावर अत्यंत प्रेम, श्रद्धा तसंच गाढा विश्वास असलेल्या पटेलनं आपला हा यज्ञ यापुढेही चालूच ठेवण्याचं ठरवलंय. त्यानं यापूर्वी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची लाकडावरील कोरीव कामाची चित्रे रेखाटून दिली होती.
मोदी यांचा टॅटू काढायला लागले सात तास :लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्याविरोधात अनेक मोठमोठे नेते एकवटले असतानाही, त्यांनी या नेत्यांचं आक्रमण मोडीत काढून भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा सत्तेवर नेण्यापर्यंतचं काम केलंय. यामुळं प्रभावित झालेल्या दिलीप पटेलनं मोदी यांच्यावर प्रेम असलेल्या दुसऱ्या एका युवकाच्या पाठीवर मोदींचा टॅटू काढलाय. हा टॅटू काढण्यासाठी दिलीपला तब्बल सात तासाचा वेळ लागला.
‘मेक इन इंडिया’चा संदेश: युवकाच्या पाठीवर भारताच्या नकाशावर ‘सबका साथ सबका विकास’चा संदेश मध्येच मोदी यांचा टॅटू. सोबत ‘मेक इन इंडिया’ सारख्या उपक्रमाचा उल्लेख या टॅटूत तयार करण्यात आला आहे. पटेलला देशातील आतापर्यंतचे राजकारण आणि त्यातील घराणेशाही तसंच आपल्या कुटुंबीयांच्या भल्याचे हित साधणारी राजकारणी मंडळी याबद्दल प्रचंड चीड असून ही चीड त्यानं व्यक्त केली.
मोदी फॅन कसे झाले: मोदी हे सातत्यानं अहोरात्र देशाच्या विकासासाठी झटत असून त्यांनी देशाचं नाव जगात अजरामर केलंय. गेल्या दहा वर्षात त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळं आपण मोदी यांचा फॅन झालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टॅटू काढण्याची संकल्पना सुचली आणि ही संकल्पना पाठीवर उतरवण्यास डहाणूच्या एका मोदी प्रेमी युवकांनी साथ दिली. त्यातून हे मोठे टॅटू आकारण्यात आल्याचं पटेल सांगतो.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार : दिलीप पटेल हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टॅटू आणि चित्रकार असून त्याला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरची पाच पारितोषिके मिळाली आहेत. त्यानं सामान्यांच्या हातावर ‘जय श्रीराम’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे टॅटू मोफत काढून दिले आहेत आणि हा उपक्रम आजही चालू ठेवला आहे. त्याला या उपक्रमात अनेकांची साथ मिळाली. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे गड किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. हे गड किल्ले संवर्धित झाले पाहिजे, अशी त्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर त्यांनं मोदींचे एक चित्र रेखटले आहे. ते काढलेले चित्र त्याला पंतप्रधान मोदी यांना भेट देण्याची इच्छा आहे.
हेही वाचा -
- मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड, 16 पक्षांचे 21 नेते बैठकीला हजर; राष्ट्रपतींनी लोकसभा केली विसर्जित - NDA Leaders Meeting
- मोदींच्या विरोधात जनादेश, INDIA आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाना - INDIA Alliance Meeting
- पराभवाची नैतिक जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पुढची रणनीती काय; वाचा सविस्तर - Lok Sabha Election Results 2024