बीड : शहरात मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक दाखल झाले होते. अंजली दमानियांसह जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे. यावेळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं. तसंच जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दुसरीकडे व्हॉट्सअप चॅटमुळे प्रशासनातील अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसतंय. तर संध्याकाळी उशिरा मनोज जरांगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल (ETV Bharat Reporter) काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? : बीडमध्ये उच्चपदांवर एकाच समाजाचे लोक आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आहे. दरम्यान, यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, मी कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू आहे, मात्र तो आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही. समाजाला माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचं काम केलं.
प्रतिक्रिया देताना मुंडे यांचे कार्यकर्ते (ETV Bharat Reporter) नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे? : धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि ते न्यायासाठी लढत आहेत. त्यांना तुम्ही धमक्या देताय. संतोष देशमुख यांचे भाऊ जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आलं. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजालाही त्रास झाला तर घरात घुसून मारायचं. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे.
पीआय गणेश मुंडे वादाच्या भोवऱ्यात : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळत आहे. शहरात प्रेस ग्रुप नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी आणि पत्रकार बांधव आहेत. ते आपल्या विचारांची देवाण-घेवाण ग्रुपवर करतात. मात्र रात्री सात वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी या ग्रुपवर एक वादग्रस्त पोस्ट करून नवा वाद निर्माण केलाय. त्यामुळं या ग्रुपमध्ये असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांनी त्यांना या ग्रुपवरून डिलीट केलं. मात्र काही वेळातच हा ग्रुप ॲक्टिव्ह असल्यामुळं यावरती पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये या पोस्टवर चर्चा झाली आणि या नव्या वादाला सुरुवात झाली. त्यामुळं आता पुढे नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहणं औचित्याच ठरणार आहे. तर प्रेस ग्रुपवर केलेल्या पोस्टमुळं पीआय गणेश मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खासदारांच्या संदर्भातील त्यांची पोस्ट अनेकांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- "सरकारला झोप कशी येते? माझी सुरक्षा काढा पण..." - सुप्रिया सुळे यांची सरकारला चपराक
- मुख्यमंत्री आवरा त्यांना…”, मनोज जरांगे पाटील यांचा 'कुणासाठी' इशारा?
- "सरकारच्या विरोधात कोणी आवाज केला तर त्याची हत्या...", संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप