नागपूर : साहित्य संमेलन हे राजकारणाचं माध्यम झाल्याचा आरोप सातत्यानं होत आहे. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून द्वेषाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप होत आहे. या विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रत्येकनं साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. विशेषतः या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नये किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं, त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही. त्यांनी मर्यादा पळायला पाहिजेत".
मर्सडीज विषयावर भाष्य करण्यास दिला नकार : विधान परिषदेच्या माजी सभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सडीज विषयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्यास नकार दिलाय. ते म्हणाले की, नीलम गोऱ्हे या त्या पक्षात होत्या, त्या पक्षामध्ये काय चालतं हे त्याचं सांगू शकतात, मी त्यावर काही कमेंट्स करणार नाही.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे अभय : आमच्याकडं जर कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. त्यामुळं तशा प्रकारची चौकशी आम्ही करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सोलर संदर्भात जाणीवपूर्वक अफवा पसरली जातेय: घरगुती वीज ग्राहकांसाठी काही अटी शर्ती लागू करण्यात येत आहेत अशी चर्चा सुरू झाली, या संदर्भात जाणीवपूर्वक अफवा पसरवले जातोय असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलाय. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी आठ तासाचा नियम लागू नाही. घरगुती सोलरधारकांवर याचा परिणाम होणार नाही. तर या उलट काही उद्योग आमच्याकडं अतिरिक्त वीज तयार होणार आहे. जर ती वीज ते वापरणार असतील तर जो काही पैसा आहे तो मिळाला पाहिजे. यासाठी या दृष्टीनं प्रस्ताव तयार केला आहे.
पीएस आणि ओएसडी नेमणे माझा अधिकार : आमच्या मनाने पीएस आणि ओएसडी देखील नेमता येत नाहीत. अशा प्रकारचं वक्तव्य करत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना कदाचित हे माहिती नसेल. पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मंत्री या संदर्भातील मुख्यमंत्र्याकडं प्रस्ताव पाठवतात आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. हे नव्याने होत नाही तर कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा, मात्र ज्यांचं नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात आहे. त्यांना मी मान्यता देणार नाही. आतापर्यंत 125 नावे आली आहेत. त्यातील 109 नावं क्लियर झाली. उर्वरित नावं क्लिअर न करण्यामागे त्यांच्यावर असणारे आरोप आहे. कोणीही नाराज झाला तरी त्याला मान्यता देणार नाही.
अल्पसंख्याक आयोगाच्या शाळांमध्ये प्रचंड अननियमित्ता :अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अल्पसंख्याक शाळांमध्ये सुरू असलेली अननियमित्ता शोधून काढली आहे. प्रचंड मोठी अनियमित्ता आहे. पोरांना शिक्षण मिळत नसून काही लोक पैसे लाटत आहेत. याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आशिष जैस्वाल यात लक्ष घालून आहेत, ही बाबही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
सर्वांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ मार्ग : कोल्हापूरच्या काही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याचं निवेदन आणून दिलं. परंतु, कुणाचाही विरोध पत्करून शक्तिपीठ मार्ग करणार नाही तर सगळ्यांन त्याचे फायदे सांगून तसंच सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्गाने करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.
सकाळी नऊ वाजताचा भोंगा : राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यावर मी काही बोलत नाही. कुठेतरी सुसंवाद होत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सगळ्यांनी सुसंवाद करावा. आपणही सकाळी नऊ वाजताच्या 'भोंगा सुसंवाद' कसा करायचा हे शिकवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा -
- शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- छत्रपतींचे 12 किल्ले जागतिक वारसास्थळे घोषित करण्यासाठी सादरीकरण करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- कोण कुणाला भेटलं यावर राजकारण होतं तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया