मुंबई-जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत काही सुधारणा करण्यात आल्यात. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळ्यात आलंय. त्यामुळं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा धक्का मानला जातोय. आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेंना वगळण्यात आल्यामुळं वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवारांची वर्णी :दरम्यान, एकीकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलण्यात आलंय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. महायुती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे शेवटपर्यंत आग्रही असल्याचे बोलले जात होते. पण त्यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळं महायुतीत शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आता शिंदेंना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत डावलण्यात आल्यामुळं फडणवीसांचा शिंदेंना धक्का मानला जातोय. या निर्णयामुळं शिंदे गट नाराज झाल्याची चर्चा आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेतील नवनियुक्ती
देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना धक्का अन् अजित पवारांना ताकद; राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळलं - DISASTER MANAGEMENT COMMITTEE
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत सुधारणा करण्यात आल्यात. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळ्यात आलंय. त्यामुळं शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला हा धक्का मानला जातोय.
![देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना धक्का अन् अजित पवारांना ताकद; राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळलं Devendra Fadnavis and Eknath Shinde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-02-2025/1200-675-23512044-thumbnail-16x9-devendrashinde-32-aspera.jpg)
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)
Published : Feb 10, 2025, 2:45 PM IST
मुख्यमंत्री - अध्यक्ष
उपमुख्यमंत्री वित्त - सदस्य
मदत व पुनर्वसन मंत्री - सदस्य
महसूल मंत्री - सदस्य
सार्वजनिक आरोग्य मंत्री - सदस्य
आपत्ती व्यवस्थापन मंत्री - सदस्य
आय आयटी मुंबई - सदस्य
मुख्य सचिव - पदसिद्ध सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी
आयआयटी मुंबई - अशासकीय सदस्य
हेही वाचा-