नागपूर : एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल, असं स्पष्ट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, हे जवळजवळ निश्चित झालं. आता केवळ औपचारिकता बाकी असल्याच्या भावना भाजपा कार्यकर्त्यांच्या आहेत.
महाविजयाचे महाशिल्पकार : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर लागले बॅनर
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण हे आज रात्री निश्चित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र तत्पुर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर महाविजयाचे महाशिल्पकार असं होर्डिंग लागलय.
Published : Nov 28, 2024, 5:07 PM IST
देवेंद्र फडणवीस महाविजयाचे महाशिल्पकार : नागपूरच्या धरमपेठ येथील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 'महाविजयाचे शिल्पकार' अशा आशयाचे होर्डिंग लागले आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपानं जिंकल्या आहेत. तरी दोन दिवसापासून मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच कायम आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री राहू शकतात, असे संकेत या होर्डिंगवरून दिसून येत आहेत. महाविजयाचे महाशिल्पकार अशा अशयाचे बॅनर लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनांच मुख्यमंत्री म्हणून पक्षश्रेष्ठी पसंती देणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
ज्यांच्या मनात किंतु परंतु होते ते एकनाथ शिंदे यांनी दूर केले : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, या संदर्भात आता स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "महायुतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत. एकनाथ शिंदे, मी आणि अजित पवार या नेत्यांसह आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. निवडणुकीच्या पूर्वीही आम्ही सांगितलं होतं की सर्व निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील. त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार आहेत. त्यामुळे कोणाच्याही मनात काहीही किंतु परंतु असेल, तर ते ही बुधवारी एकनाथ शिंदे यांनी दूर केले आहेत. पुढील प्रक्रियेसंदर्भात आमची आमच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.