महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जागेबाबत कोणाला पाठिंबा असणार? दिपक केसरकरांनी डायरेक्ट सांगितलं की.... - Deepak Kesarkar - DEEPAK KESARKAR

Deepak Kesarkar : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. तसंच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंब्याचे दोन बॉक्सही साई बाबांच्या चरणी अर्पण केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गच्या जागेबाबतही विधान केलंय.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 7:46 PM IST

केसरकर

शिर्डी Deepak Kesarkar : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जावून साई समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंब्याचे दोन बॉक्स साईबाबांच्या चरणी अर्पण केले. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले, "सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत केली जातेय. शरद पवार यांच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. मोठी माणसे वेळोवेळी भूमिका बदलत असतात. आमच्यासारख्या छोट्या माणसाने काय बोलावं."

तीन लाखांच्या फरकाने निवडून येईल : "पर्वापासून मी प्रचाराला सुरुवात करतोय. जो कोणी आमचा महायुतीचा उमेदवार असेल त्याला जास्त मताधिक्याने निवडून आणून मोदींना ताकद देवून आपला देश बलवान बनवायचा आहे," असंही केसरकर म्हणाले. "हेमंत गोडसे चांगले उमेदवार आहेत. साईबाबांच्या कृपेने गोडसेंना तिकीट मिळावे आणि जास्त मताधिक्याने निवडून यावे," असंही केसरकर म्हणाले. "सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आम्हाला जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही निवडून आणू. किरण सामंत असो किंवा नारायण राणे असो, जो कोणी उमेदवार असेल तो किमान 3 लाखांच्या फरकाने निवडून येईल," असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले होते केसरकर : "पाकिस्तानची भारताकडं वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होत नाही. एक काळ ते आपल्या ताब्यातील काश्मीर घेण्याची स्वप्ने पाहात होते. पण आज पाकव्याप्त काश्मीरमधील लोक मोदींसारखे पंतप्रधान हवेत असं युट्युबवर बोलताना दिसतात. आपल्या देशाचा नकाशा पाकव्याप काश्मीरसह संपूर्ण भारताचा आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील श्री राम मंदिर झालं. 370 कलम हटवलं, त्याप्रमाणं एकदा निवडणुका होऊ द्या. युद्ध केल्याशिवाय भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही," असं मोठं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथील सभेत बोलताना केसरकर यांनी हे विधान केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details