महाराष्ट्र

maharashtra

नागपुरातील विकासकामांसाठी 1 हजार 36 कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निधी कमी पडू देणार नाही' - Devendra Fadnavis News

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 10:11 AM IST

Devendra Fadnavis On Development Work : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन बैठकीत 1 हजार 36 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही," असं आश्वासन दिलं.

Devendra Fadnavis News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

नागपूर Devendra Fadnavis News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नागपूर इथं पार पडली. यामध्ये 1 हजार 36 कोटी 38 लाख रुपयांच्या विकासकामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नागपूर जिल्ह्यात सर्व मतदारसंघात चांगलं काम झालं पाहिजे, यासाठी निधीच्या वापरासाठी काटेकोर नियोजन अधिक प्रभावी झालं पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावेळी ईतर विकासकामांसाठी 5 हजार कोटींचा निधी सरकारच्या वतीनं देण्यात येईल, असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter)

जिल्हा नियोजन भवनाचं लोकार्पण : नागपूरच्या प्रशासकीय वैभवात भर घालणाऱ्या जिल्हा नियोजन भवनाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या नियोजन भवनातील सभागृहात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा नियोजन भवनाच्या पहिल्या माळ्यावर जिल्हा नियोजन अधिकारी, नागपूर यांचं कार्यालय, सभागृहात व्यासपीठावर 28 मान्यवरांची आसन व्यवस्था आणि अधिकारी, प्रतिनिधींसह इतरांसाठी 294 खुर्च्यांची आसन व्यवस्था आहे. दुसऱ्या माळ्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये 28 व्यक्तींची बैठक व्यवस्था आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकरी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना स्वतंत्र दालनं या ठिकाणी आहेत. तळमाळ्यावर प्रतिक्षालय आणि दुसऱ्या माळ्यावर ग्रंथालयाची व्यवस्था आहे.

शेतकऱ्यांना वीजमाफीचा काढला जीआर : राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वीज बिलमाफीचा जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही. आगामी काळात आमचं सरकार आल्यानंतर पुन्हा आमचं सरकार निर्णय घेईल, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

तृतीयपंथीयांना विविध लाभाचं वाटप : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सामाजिक न्याय विभागासह नवीन योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना विशेषत: तृतीयपंथीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभाचं वाटप करुन आश्वस्त केलं. यात प्रामुख्यानं तृतीयपंथीयांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता देऊन तसं प्रमाणपत्र त्यांना बहाल केलं. किन्नर विकास बहुउद्देशिय सामाजिक संस्था आता नागपूर इथून सामाजिक न्यायाचा नवा आयाम सुरु करत आहे. याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दोन किन्नरांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अनुभवाची संधी दिली जाणार आहे. हे प्रमाणपत्रही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आलं.

हेही वाचा :

  1. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा खुलासा - Devendra Fadnavis Statement
  2. देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी? महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर - Devendra Fadnavis
  3. देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष ? काय आहेत निवडीमागची समीकरणं, काय म्हणाले भाजपातील नेते ? - Devendra Fadnavis

ABOUT THE AUTHOR

...view details